नुकतंच बोलण्यास सुरवात करावी
आणि वेदमंत्र शिकता
शिकता बाप्पाचं मिळालेलं
'स्वर-गंधित' आश्वासन.
'होतो वर्षानं एकदाच
हर्ष' म्हणून त्याच्या
येण्याच्या तयारीसाठी केलेली धावपळ.
अडीच दिवसाच्या बाप्पासमोर
बसून केलेली आवर्तन
आणि बरेच काही…
आरती म्हणावी
तर बोरिवलीच्या ‘काजूपाड्यातच’..
मखर आणि सजावट
इतकी सुंदर असायची
की सार्वजनिक गणपतीला
सुद्दा बघायला तितकी गर्दी
नसायची.. अगदी आबालवृद्धांपर्यंत
टाळ-मृदूंगाच्या गजरात
'जयघोष चाले तुझा
मोरया' कंटाळल्याविण दोन-दोन
तासही चालायचा.
अगदी जेवून
रात्री डोंबिवलीतील सर्व सार्वजनिक
गणपती पाहण्यासाठी ‘रिक्षेत
सीटच्या मागे’ अडचणीत बसून
पहिला नंबर लावत
'धन्य तुम्हारो दर्शन
मेरा मन रमता'
म्हणत म्हणत ते
अगदी आईसोबत नागरिक
संरक्षण दलाच्या विसर्जनाच्या ड्युटीसाठी
सोबत नेमाने जात
सरलेलं बालपण. निघताना आजी-आजोबांकडून खाऊसाठी मिळणारं
‘बक्षीस’.
‘मोदमयी बाप्पा’
सोबतच मोठेपणी झालेली ‘प्रसन्नवदना
गौराई’शी ओळख. गौरीआगमन आणि त्या
सजावटीसाठी केलेली धमाल
स्मरणीय आहेच.
भूक लागली
की हक्कानं ‘अमर्यादित’
वडापाव
खाण्याचा दिवस म्हणजे
विसर्जनाचा दिवस. ढोलपथकाचं विलक्षण
आकर्षण अगदी आजही
आहेच पण १२-१५ वर्षांपूर्वी
एक विलक्षणच गंमत
होती. कित्येक ताल तेव्हा
‘वाजवता’ येत नसतीलही.
पण ‘मुखोद्गत’ मात्र
नक्की व्हायचे. ‘ओळखीच्या’
मोदक, लाडूंसोबतच वाजविणारे ‘ओळखीचे’ व्हायचे
ती गोष्ट वेगळीच.
बंधुराजांसोबत कित्येक तास ‘उभं
राहण्याची’ मजा काही
औरच; रस्त्यालगतच घर
असल्याने गॅलरीत विसर्जन मिरवणूक
पाहायला होणारी गर्दी, त्यात
आपलं घर म्हणून
बसण्याची व्यवस्था आणि होणाऱ्या
गप्पा.
उत्सवांचं स्वरूप
बदललं पण उत्साह
मात्र कायम आहे.
'त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि'
अशा बाप्पाचं रूप
आजही मनांत तसंच
आहे. बुद्धीच्या देवतेकडे
'विवेकाची मागणी' करत ''निरोप
घेतो आता आज्ञा
असावी' म्हणण्याचा क्षण यंदाही
आला आहेच.. “इष्ट
काम प्रसिध्यर्थ पुनरागमनायच”
म्हणण्यासाठी!!