Wednesday, 6 April 2016

आनंदयात्री...





मूळात  मी 'कवी' नाही.. अक्षरांचा खेळ मांडत नाही
शोधात असतो 'स्व'च्या कधी कधी.. दुस-याचं स्वातंत्र्य मात्र हिरावून घेत नाही

मूळात मी 'लेखक' नाही.. शब्दांची जुळवाजुळव करत नाही
Appointment देता मनात येती शब्द.. मग लिहायचं मात्र टाळत नाही
 
मूळात  मी 'अभिनेता' नाही.. नकलां तून  कला साकारत नाही
त्याच्या रंगभूमीत लागलं, खरचटलं तरी, हसत भूमिका काहीसोडत’ नाही

मूळात  मी 'गायक' नाही.. सूर-ताल काही छेडत नाही
ऐकू येताच भाव अंतरीचे.. जीवनगाणे काही बिघडत नाही।

मूळात  मी 'वाचक' नाही..पुस्तकांच्या कोशातच रहात नाही।
'मौलिक पृष्ठां'शी नाळ जोडल्याखेरीज.. 'ज्ञान'दीप कुणा मिळत नाही

मूळात मी 'फूल' नाही.. भविष्याची वाट पहात नाही।
जोडून ठेवतो फक्त मूळांशी नाळ.. मरणाचे भय बाळगत नाही

जाणिव होतं आहे हळूहळू  की.. मी आहे 'आनंदयात्री' ह्याभव’सागराचा प्रवास करणारा।
त्या अदृश्य नावाड्याच्या हातात बोट देऊन.. साहसाच्या बळावरमार्गक्रमण’ करणारा।





No comments:

Post a Comment