Tuesday, 21 June 2016

सदा सर्वदा 'योग' तुझा घडावा..।



ब-याचदा योगासने या अर्थी योग या शब्दाचा वापर होतो. परंतू योग हा शब्द  संस्कृत भाषेतील ‘युज्:’ या धातूपासून बनला आहे. योग शब्दाचा अर्थ  जोडणे . (To Join)  योग म्हणजे केवळ आसने नव्हेत तर ही  प्राचीन भारतीय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीची  चिकित्सापद्धत आहे. योग हा अनादीकाळापासून चालत आला आहे. हिरण्यगर्भ हे योगदर्शनाचे प्रणेते आहेत. ज्याप्रमाणे गणितामध्ये सूत्रांचा वापर केला जातो त्याप्रमाणेच सर्वांना समजेल आणि लक्षात राहील अश्या सोप्या भाषेत महर्षी पतंजलिं यांनी  १९५ 'सूत्र'रुपात योगदर्शन मांडले आहे. महर्षी पतंजलिंच योगदर्शन  समाधि, साधन, विभूति,कैवल्य या चार (पाद) भागांमध्ये विभागलेलं आहे. समाधिपाद या भागात योगाचा उद्देश आणि  लक्षणे यांविषयी वर्णन आहे. साधनपाद या भागात क्लेश,कर्मविपाक आणि  कर्मफळ यांविषयी वर्णन आहे.  विभूतिपाद या भागात योगाची अंग त्याचे परीणाम आणि त्याद्वारा प्राप्त होणा-या सिद्धि यांविषयी वर्णन आहे.  कैवल्यपाद या भागात कैवल्य (मोक्ष) याविषयी वर्णन आहे.
  • समाधि पाद (५१ सूत्र)
  • साधन पाद (५५ सूत्र)
  • विभूति पाद (५५ सूत्र)
  • कैवल्य पाद (३४ सूत्र)
       एकुण सूत्र = १९५


यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.
                                                  

अष्टांगयोग
यम
नियम
आसन
प्राणायाम
प्रत्याहार
धारणा
ध्यान
समाधी
अहिंसा
शौच
योगासन :
शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन.
प्राणाचे विविध अवयवांतील प्रमाण असंतुलित झाल्याने शरिरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो.
श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.
प्रत्याहार म्हणजे त्या त्या इंद्रियांचे विषयभोग त्यांना देणेविषयांवर आपले नियंत्रण ठेवुन  त्यांच्या आहारी   जाणे .
धारणाम्हणजे मन एकाग्र करणेजेव्हा एखाद्या आसनात बराच वेळ स्थिर बसण्याची क्षमता शरीरात निर्माण होते आणि प्राणायामाने मनावर नियंत्रण करता येते. तेव्हा धारणा होते.
धारणापुढे सतत करतच राहणे याला ध्यान असे म्हणतात. सततच्या धारणेमुळे ध्यान साध्य होते
समाधीमध्ये शरीर स्थिर आणि मन निर्विकार झालेले असते. सुख-दुःख इत्यादितुन मुक्त झालेले असते. यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या आवश्यक असते.
सत्य
संतोष
अस्तेय
 तपस
अपरिग्रह
स्वाध्याय
ब्रह्मचर्य
ईश्वरप्रणिधान
















                                                


Monday, 20 June 2016

रे कबीरा…






“जो मनाने वाईट आहे तो काशीत गेला तरी त्याचा नरक चुकणार नाही आणि खरा भक्त कुठेही मेला तरी नरकात जाणार नाही”, असे ठामपणे सांगणारा प्रबोधक संत… अंधश्रद्धेवर प्रकर्षाने हल्ला चढवणारा बंडखोर कवी म्हणजे संत कबीर. जन्म कुठल्या कुळात झाला हे महत्त्वाचे नाही तर माणूस आपल्या ‘कर्माने श्रेष्ठ होऊ शकतो’ हे दाखवून देणारे एक ‘प्रभावी विणकर’... ईश्वरनिष्ठा, प्रेम, अहिंसा हि ‘मूल्ये’ कबीराच्या काव्यातून व्यक्त होताना दिसतात. कबीराच्या कवितेत 'राम', 'हरि', 'अल्ला रहिम' हे शब्द अनेकदा येतात. कबीराचा ईश्वर ‘एक’ आहे आणि तो सर्व ‘सृष्टीत व्यापून’ राहिलेला आहे. जातिभेद, धर्मभेद यापलीकडे जाणारा तो एक 'सत्यनिष्ठ' अनुभव आहे.
ज्याला कागदाचा, शाईचा स्पर्श कधीही झाला नाही.. ज्याने कधी लेखणीही हाती घेतली नाही.. भक्तीच्या जोरावर तो देखील महापुरुष होऊ शकतो हि घटना देखील स्फूर्तीदायक आहे. वैचारिक प्रवास, भटकंती यांतून मिळालेले ज्ञान हेच त्यांचे विद्यापीठ होते.

पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भया न कोए |
ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होए ||

अशी पंडितांची क्रांतिकारी व्याख्या सांगणारा तत्वज्ञ. सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत त्यांनी अध्यात्माचे ‘ज्ञान’ दिले. हिंदू आणि सुफी सिद्धांताच्या खुणा त्यांच्या काव्यात उमटलेल्या दिसतात.
हिंदू - मुस्लिम ऐक्यातून 'राष्ट्रीय ऐक्य ' जपणारा हा अनोखा देवदूत. त्यांचे काव्य 'कबीरबानी ' या नावाने ओळखले जाते. ज्यात एक विलक्षण साधेपण आहे, आंतरिक अनुभव आहे. लोकांच्या मनाशी संवाद साधणारा हा अनोखा संतकवी..



मना, रे कुठे उतरून जासी?
पुढे पंथ वा पथिक हि नाही गाठ ना मुक्कामासी ;
नसे नीर, नावाडी, नौका,  कुणी न दोर खेचाया, 
गगन, धरा, कालगती नाही, नसे तीर उतराया ;
तनमन नाही, मीपण नाही, शून्य न तू शोधावे,
तो बलवंत घटातच आहे, शरण तयाला जावे ;
विचार करुनी पहा मना तू, अंत कुठेही नाही,
कबीर म्हणे तू सोड कल्पना, असशि तसा तू राही.