फेकिता देह मी सागरी.....
घेतले प्राण हातावरी। फोडुनी
क्रूर कारातरी।
फेकिता देह मी
सागरी॥
मुक्त मी या
क्षणी। तोडुनी दावणी।
ना क्षिती यापुढे जीव
घेवो कुणी। वाहुनी
दैव माथ्यावरी।।१॥
स्वस्थ शत्रु मनी। रोखुनी
संगिनी।
मान फासावया नेतसे बांधुनी।
उर्मि आली तशी
अंतरी।।२॥
मुक्तिचा भक्त मी।
कोंडलेला तमी।
गौ गवाक्षातुनी जम्नभू ते
नमी। छत्रवारी उषा
अंबरी।।३॥
नष्ट हो दुर्दशा।
बंधनाची निशा।
भारता भानुचार रश्मि दावो
उषा। अर्ध्य सुर्यासी
देण्याकरी।।४॥
सिध्द मी चेतना।
तुच्छ मानी तना।
वध्य ना छेद्य
ना शोष्य ना
क्लेश ना। निर्भय
नाव रे संगरी॥५॥
मारण्याला मला। शत्रु
ना जन्मला।
येत जो मारण्या
तोच भांबावला। दूर
जाई भयाने अरी॥६॥
तोफ बंदूक वा। सैनिकांचा
थवा।
अवती भोवती चालू दे
तांडवा।
सत्य मी नित्य
मी भूवरी॥७॥
सागर भेट ....
स्पर्शाने त्या सागर
शरीरी उठला गोड
शहारा
शिरी घेऊनी नाचे तो
त्या मृत्युंजय वीरा
॥धृ॥
अवघे जलचर अचल
जाहले
काळालाही भान न
उरले
कार्य आपुले विसरून गेला
काही क्षण वारा
॥१॥
स्वातंत्र्यवीरांचे
पाहूनी बंड
वडवानलही होई थंड
सागरतळीच्या
रत्नांचाही उतरून गेला तोरा
॥२॥
सूर्य, चंद्र, नक्षत्र नी
तारे
स्तिमित झाले देवही
सारे
भारतप्रेमी
अत्यानंदे करिती जयजयकारा ॥३॥
अशा वीराशी आपुले नाते
कधी ना विसरू
आपण त्याते
सागरभेटीच्या
शतस्मृती
दिनी मानाचा मुजरा ॥४॥
स्पर्शाने त्या सागर
शरीरी उठला गोड
शहारा ।
शिरी घेऊनी नाचे तो
त्या मृत्युंजय वीरा
॥
त्रिखंडात गाजलेली उडी .....
ही अशी उडी
बघताना ।
कर्तव्य मृत्यू विसरला ॥
बुरुजावर फडफडलेला ।
झाशीतील घोडा हसला॥
१॥
वासुदेव बळवंतांच्या ।
कंठात हर्ष गदगदला
॥
क्रांतीच्या
केतूवरला ।
अस्मान कडाडून गेला ॥
२ ॥
दुनियेत फक्त आहेत
।
विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईकरिता
।
सागरास पालांडुन ॥ ३ ॥
हनुमंतानंतर
आहे ।
या विनायकाचा मान ॥
लावुनिया प्राण पणाला ।
अस्मान कडाडून गेला ॥
४॥
No comments:
Post a Comment