आहाहा.. काय ते
लोभसवाणं रूपं होतं
तिचं !! जणु पाऊस
येताच मयूरपक्ष्यानं नृत्य
करावं असं.. बाह्यशृंगार,सजावट नव्हतीच..पण
प्रात:काळी तिला
पाहिलं आणि तिच्या
डोळ्यांत जाणवलं - 'विलक्षण कारुण्य.'
'' एक तेरे अदा
कि, रौदाद हो
गए है हम,
मस्ती में एक
हसीं को, खुदा
कह गए है हम
''
कुठेतरी ऐकलेली शायरी जणु
तिच्यासाठीच बनली असावी
असंच मला वाटलं
मी काहीच न बोलता
फक्त बघुन हसलो.
भेटीगाठी तर नियमित
होत होत्याच पण
आज नेमकं कुठून
बोलणं सुरु करावं
हेच समजत नव्हतं. मग
शेवटी मीच काहीतरी
विचारायचं म्हणून म्हंटलं,कसं
चाललंय जॉबचं ? कधी वर,
कधी खाली कधी
मोबाईलमध्ये डोकं खुपसत,
कधी ओढणीशी खेळत..
असं कितीही गुंतलेलं
असलं तरी तिची
नजर माझ्याकडेच स्थिरावली
होती. एकमेकांना सारं
काही ठाऊक होतं
आणि जाणवलं ही
होतं. फारसा विलंब
न करता फक्त
स्वीकारायचं होतं.. कधीही 'अस्वीकार'
न करण्याचं बंधन..
आज माझ्या आयुष्यातील सर्वात
मोठा दिवस होता.
मला कंपनीने मॅनेजिंग
डिरेक्टर म्हणुन बढती दिली
होती, त्याची पार्टी
होती. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती,मित्रमंडळी, नातेवाईक सर्व
हजर होते. आमच्या
'सौ'नादेखील रीतसर आमंत्रण होते
आणि मी सुद्धा
दहावेळा फोन केला
होता, “आज तुला
यायचं आहे हा..”.
ती आलीच नाही
, फोनही लागत नव्हता.
मी मनाची समजूत
घातली, ती कामात
असेल म्हणून जमलं
नसेल कदाचित. सगळ्यांना
ती आजारी आहे
असं सांगून वेळ
मारून नेली खरी
; पण मला तिचा
प्रचंड राग आला
होता. कारण ‘हे
असं’ करण्याची तिची
पहिलीच वेळ नव्हती.
खूपदा असं झालं
होतं आणि कळस
म्हणजे नुकत्याच
झालेल्या आमच्या लग्नाच्या 'दहाव्या'
वाढदिवसाला देखील
तिने असंच केलं
होतं.
सर्व आटोपून मी
घरी तिच्यासाठी जेवण
घेऊन गेलो. आणि
बघतो तर काय,ही खुशाल
झोपली होती. वाटलं
गदागदा हलवून तिला उठवावं
आणि जाब विचारावा
की निदान मला
अभिनंदन तरी करायला
यावं असं वाटलं
नाही का तुला ? तिने
माझ्यासाठी चिट्ठी लिहिली होती..
'सॉरी डिअर, मला
यायला उशीर झाला.
मी दमली होती
म्हणून नाही आले
तुझं खूप खूप
अभिनंदन.. Good Night.. ‘
एकदा न येण्याची
चूक मलाही मान्य
झाली असती.पण
चिठ्ठीचा हा उपाय
‘नेहमीचाच’ असल्याने मला त्याचं
फारसं काहीच वाटलं
नाही. मी हा
असाच.. नातेवाईक मला बायकोच्या
आधीन गेलेला प्राणीदेखील
म्हणतात.
मी भूषण ! BE झालेला मध्यमवर्गीय
कुटुंबातला, घरात दोघे
भावंडं आणि आईबाबांसोबत
राहणारा, एका MNC मध्ये
काम करणारा, मला
फारसं भांडता येत
नाही हाच मुद्धा
माझ्या आईलासुद्धा न पटणारा..
वैदेही! माझी पत्नी,
Bsc.IT झालेली, कुटुंबातील एकुलती
एक , सतत काहीतरी
नवीन करायची आवड
असलेली, जिद्दी, महत्वाकांक्षी ,कामातच
मन रंगवणारी एक
स्वछंदी मुलगी.. आमचं
लग्न आधी ‘अरेंज’
झालं मग आम्ही
एकमेकांच्या ‘प्रेमात’ पडलो.
ती झोपली होती; बाजूला
मी शांत उभा
होतो. आज अशी
वेळ आली होती
की एकत्र राहत असलो
तरी एकाच घरात
दोन अनोळखी राहत
असल्याची जाणीव मला झाली.
वैदेही.. तिचं स्वतःच
असं वेगळं विश्व
जरी असलं तरी
त्यात मीदेखील होतो..
तिला वेळ देणं
फारसं जमत नव्हतं.
त्या दिवशीच्या प्रसंगांनंतर
एकदा तिचाच मॅसेज
आला.. आज वेळ
आहे का तुला
? मरीन ड्राईव्ह ला भेटूयात
का ? मी काहीही
विचार न करता
हो म्हणालो. आज
ती वेळेआधी आली
होती, मग इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या..
ती काहीच बोलत
नव्हती.. मी विचारलं
काही हवंय का
? काही सांगायचं आहे का
?
ती एवढंच म्हणाली.. ''माझं
मुकेपण जर
तुला समजलं नसेल
तर माझे शब्दही
तुला कळणार नाहीत..!!''
मला आठवलं..
''जब तुलू
आफताब होता है,
गम के सागर
उछाल देता हूँ,
ताझकीरा जब
वफा का होता
है, मैं तुम्हारी
मिसाल देता हूँ
''
क्रमश:
Time-प्लीज
(भाग १)
No comments:
Post a Comment