Tuesday, 2 February 2016

...आपलसं ‘सुंदर’ करायचं I





नुसतंच काय असं बसून काठावर, ‘माझं – माझं’ “म्हणायचं” I
गाठून सूरासवे ‘तळ’, आपलसं ‘सुंदर’ “करायचं” II धृ II

प्रभात समयी अश्वासवे आम्ही, भूमिकेत शिरतो ‘युद्धाच्या’ ,
उगा मारती वाचाळवीर हे, ‘ढोंगी गप्पा’ विरामाच्या II
‘झुळूकी’बरोबर ‘झंझावाता’ने, साम्राज्याला न्याहाळायचं ,
कधीतरी मग अशा रपेटीस, ‘अश्वावरुनी’ निघायचं II १ II

शब्दच करती प्रकट भाव ते, ‘हस्त – नेत्रांचा’ खेळ असे ,
वाटे बहुधा चित्रगृहातील, ‘मुकी – आंधळी’ भेळ असे II
करण्या जीवनगाणे सुंदर, ‘आवाजाला ओळखीचं’ बनवायचं ,
द्यायची कामाला ‘बुट्टी’ ठरवून, ‘चहासाठी ‘मग “भेटायचं” II २ II

दिवसभराचा प्रवासवेध, लुकलुकत्या ‘नयन’ ता-यांसवे ,
तेव्हाच होती नेत्रांकडूनी, मिटून घेण्याची “आर्जवे” II
हो हो म्हणता हळू हळू मग, डोळ्यांनाही ‘फसवायचं’ ,
सारून बाजूला कधीतरी मग, झोपेला ‘गुड नाईट’ “म्हणायचं” II ३ II

माझ्या निरागस शब्दाकारांना,  तुम्ही सदा फक्त ‘वाचायचं’ I
डोक्याने नाही ’चावायचं’, पण हाताने “उत्तर धाडायचं” II ४ II

No comments:

Post a Comment