Showing posts with label 'प्रयोग'शाळा. Show all posts
Showing posts with label 'प्रयोग'शाळा. Show all posts

Tuesday, 21 June 2016

सदा सर्वदा 'योग' तुझा घडावा..।



ब-याचदा योगासने या अर्थी योग या शब्दाचा वापर होतो. परंतू योग हा शब्द  संस्कृत भाषेतील ‘युज्:’ या धातूपासून बनला आहे. योग शब्दाचा अर्थ  जोडणे . (To Join)  योग म्हणजे केवळ आसने नव्हेत तर ही  प्राचीन भारतीय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीची  चिकित्सापद्धत आहे. योग हा अनादीकाळापासून चालत आला आहे. हिरण्यगर्भ हे योगदर्शनाचे प्रणेते आहेत. ज्याप्रमाणे गणितामध्ये सूत्रांचा वापर केला जातो त्याप्रमाणेच सर्वांना समजेल आणि लक्षात राहील अश्या सोप्या भाषेत महर्षी पतंजलिं यांनी  १९५ 'सूत्र'रुपात योगदर्शन मांडले आहे. महर्षी पतंजलिंच योगदर्शन  समाधि, साधन, विभूति,कैवल्य या चार (पाद) भागांमध्ये विभागलेलं आहे. समाधिपाद या भागात योगाचा उद्देश आणि  लक्षणे यांविषयी वर्णन आहे. साधनपाद या भागात क्लेश,कर्मविपाक आणि  कर्मफळ यांविषयी वर्णन आहे.  विभूतिपाद या भागात योगाची अंग त्याचे परीणाम आणि त्याद्वारा प्राप्त होणा-या सिद्धि यांविषयी वर्णन आहे.  कैवल्यपाद या भागात कैवल्य (मोक्ष) याविषयी वर्णन आहे.
  • समाधि पाद (५१ सूत्र)
  • साधन पाद (५५ सूत्र)
  • विभूति पाद (५५ सूत्र)
  • कैवल्य पाद (३४ सूत्र)
       एकुण सूत्र = १९५


यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.
                                                  

अष्टांगयोग
यम
नियम
आसन
प्राणायाम
प्रत्याहार
धारणा
ध्यान
समाधी
अहिंसा
शौच
योगासन :
शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन.
प्राणाचे विविध अवयवांतील प्रमाण असंतुलित झाल्याने शरिरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो.
श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.
प्रत्याहार म्हणजे त्या त्या इंद्रियांचे विषयभोग त्यांना देणेविषयांवर आपले नियंत्रण ठेवुन  त्यांच्या आहारी   जाणे .
धारणाम्हणजे मन एकाग्र करणेजेव्हा एखाद्या आसनात बराच वेळ स्थिर बसण्याची क्षमता शरीरात निर्माण होते आणि प्राणायामाने मनावर नियंत्रण करता येते. तेव्हा धारणा होते.
धारणापुढे सतत करतच राहणे याला ध्यान असे म्हणतात. सततच्या धारणेमुळे ध्यान साध्य होते
समाधीमध्ये शरीर स्थिर आणि मन निर्विकार झालेले असते. सुख-दुःख इत्यादितुन मुक्त झालेले असते. यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या आवश्यक असते.
सत्य
संतोष
अस्तेय
 तपस
अपरिग्रह
स्वाध्याय
ब्रह्मचर्य
ईश्वरप्रणिधान
















                                                


Tuesday, 3 May 2016

प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा...






हि मायभूमी ही, जन्मभूमी ही, कर्मभूमी ही अमुची,
महावंदनीय अतिप्राणप्रिय,  ही माय मराठी अमुची

हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्यपताका भगव्या जरी पटक्याची,
महाराष्ट्र भूमी ही, जन्मभूमी ही, कर्मभूमी ही अमुची,
महावंदनीय अतिप्राणप्रियही माय मराठी अमुची

राकट देशा - कणखर देशा - दगडाच्या देशा... 
प्रणाम माझा घ्यावा.. हे श्री महाराष्ट्र देशा,
भीमा - वरदा - कृष्ण - कोयना - भद्रा - गोदावरी,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
योग्यांची अन् संतांची, भक्तांची, माळक-यांची..
ही देव देश  अन् धर्मासाठी प्राण वेचणा-यांची,
योध्यांची अन् वीरांची, तलवारीच्या पात्याची..
देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणा-यांची,
ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची,
काव्याची, शास्त्रविनोदाची ही भूमी साहित्याची...


महाराष्ट्र भूमी ही, जन्मभूमी ही, कर्मभूमी ही अमुची,
महावंदनीय अतिप्राणप्रियही माय मराठी अमुची