Showing posts with label मन-'सरगम'. Show all posts
Showing posts with label मन-'सरगम'. Show all posts

Thursday, 18 February 2016

....बोलतो सत्य जे गमते!




















होतात देऊळे नष्ट
होतात देवता भ्रष्ट
गो-ब्राह्मण ओरडीती
धर्मावरती संकष्ट
न्याय नीती उरली नाही
सारेच भोगती कष्ट

हा घोर मांडीला ज्यांनी
त्यांचिया पुढे जावोनी
देशाभिमान सांडोनी


प्रेमाच्या मंगल माते!
लववेना हे शिर माते !!



तू सांग ?तुझ्या चरणाशी हि तोडून ठेवीन मान
तू सांग ? तात चरणाशी कापोनी ठेविन मान
देश,देव,धर्मासाठी  खड्गावर ठेवीन मान


परि परके सत्ताधारी
गृही शिरोनी झाले वैरी
बघतांच तयाना भारी


सक्रोध वृत्ती मम होते!
लववेना हे शिर माते !!


मी म्हणता "नाही..नाही..!" दरबारी नेले आई !
जो आत शिरोनी पाही, वर चढोनी गेली भुवई !
मुज-याला हात न वाही शिर लववू शकलो नाही !


हे सिंहासन कोणाचे ?
हे वैभव तरी कोणाचे ?
काहूर मनी प्रश्नाचे


अपहारी नृपसत्तेते!
लववेना हे शिर माते !!



एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो !
ढळाढळा आई गे ! रडतो त्वेषाने आणि संचारतो !
झोपेत देशबंधुंच्या दुख्खाने दचकून उठतो ! 


बोलते भवानी “उठ ?”
बोलते जन्मभू “उठ ?”
“धर समशेरीची मूठ !”


अवमानून त्या आज्ञेते!
लववेना हे शिर माते !!



 देशाचा राजा नाही, राजनिष्ठ राहू कैसा ?
धर्माचा राजा नाही, राजभक्त होऊ कैसा ?
या उलट्या बोध गळाते, जीवनाचा अडके मासा !


ज्या शिरी भार देशाचा
ज्या शिरी भार धर्माचा
कर्तव्ये वाहायचा


विसरुनी देशधर्माते !!
लववेना हे शिर माते !



स्वाभिमान सुटला ज्यांचा, देशभक्ती सुटली ज्यांची
कुलकीर्तीचा इतिहास, स्मृती देईल उज्वलतेची
वाढवोत ते ते शोभा,दास्याच्या दरबाराची 


उद्दाम म्हणो कुणी माते,
कि करोत उपहासाते
परि जागोनि स्वत्वाते


हिंदू द्वेषी तख्ताते !
लववेना हे शिर माते !!


सुलतान जाहला क्रुध्द , उमराव जाहले क्रुध्द
जातिवंत झाले स्तब्ध, जनकही होय हतबुध्द
परि तुझी आणि अंबेची, शिरी कृपा असावी शुध्द


मावळचे जमवुनी भाई
स्थापीन मराठेशाही
हलवीन आदिलशाही


बोलतो सत्य जे गमते! 
लववेना हे शिर माते !!

Wednesday, 20 January 2016

जय देव, जय देव, जय जय शिवराया । या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ।।



जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया धृ
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय का गेला ॥१॥
श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥ 

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥



 



 














अर्थ :-

हे शिवराया तुझा जयजयकार असो.
तुझ्याशी अनन्य शरण झालेल्या आर्यांचे  तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्या संकटांचे निवारण करण्याकरता तु ये. ॥धृ॥

या आर्यभूमीवर इस्लामचे आक्रमण आले आहे त्या मुळे हे भूमीच्या पालनकर्त्या शिवराया तू सावध हो. सद्गतित कंठाने ही भूमाता तुजला आळवत आहे. हा करुणाघन असा आवाज तुझे हृदय भेदून टाकीत नाही काय ? ॥१॥

शुंभ निशुंभ यांचे निर्दालन करणारी ही जगन्माता. दशानन रावणाचे मर्दन करुन या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सपूत ही भारत माता प्रसवली. अशी ही भारतमाता इस्लामच्या छळाने गांजून गेलेली आहे. हे शिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार या मातेला कोण आहे बरे ? ॥२॥

अतिशय त्रस्त झालेले आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलेलो आहोत. पारतंत्र्यामुळे आम्हाला मरणकळा आलेली आहे. संत सज्जनांच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतो असे गीतावाक्य आहे. श्रीकृष्णाचे हे वाक्य सार्थ ठरवण्याकरता हे शिवराय तुम्ही या. ॥३॥


आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गाधिष्ठीत तो शिव राजा गहिवरुन गेला. या देशासाठीच तो शिवनेरी गडावर जन्म घेता झाला अन् देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करता झाला.
अशा शिवराजाचा जयजयकार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय ! ॥४॥
 
-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

Wednesday, 18 November 2015

'माझ्या मातीचे गायन'



'माझ्या मातीचे गायन',
तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा 'कानोसा' देऊन,
कधी ऐकशील का रे ?

             माझी धुळीतील चित्रे,
             तुझ्या 'प्रकाश नेत्रांनी'
             जरा पापणी खुलून,
             कधी 'पाहशील' का रे ?

माझ्या जहाजाचे पंख,
मध्यरात्रीत माखले
'तुझ्या किना-यास' दिवा,
कधी 'लावशील' का रे ?


              माझा रांगडा अंधार,
              मेघा-मेघात साचला
              तुझ्या 'उषेच्या कानी',
              कधी 'टिपशील' का रे ?

वर्ख लाऊन कागदी
माझे 'नाचते बाहुले',
कधी 'कराया कौतुक'
खाली 'वाकशील का रे' ?
       
- कुसुमाग्रज

Wednesday, 11 November 2015

ॐकार अनादि अनंत



ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार


सूर स्पर्श सूर श्रवण
स्वरगंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार


सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार


सप्‍तसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार


गीत  - सुधीर मोघे

संगीत - सलील कुलकर्णी

स्वर - सलील कुलकर्णी



स्रोत : aathavanitligani.com