Saturday, 27 February 2016

लाभले अम्हास भाग्य...


हिच मराठी हिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी,
शिवबाने तलवार घासली ह्याच मराठीवरी,
हिच्या स्वागतासाठी लढले
तोफांचे चौघडे,
समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे.. 

टिळक,गोखले,फुले,रानडे, आगरकर वैखरी,
स्वातंत्र्याच्या पाच मशाली पेटती वेदींवरी,
या वेदींवर दिप पेटवा, चला भविष्याकडे,
समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे.. 

स्वातंत्र्याचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
हेच मराठे आम्ही, आम्ही सह्याद्रीचे सुळे,
स्वराज्याकडुनी चला चला रे, चला स्वराज्याकडे
समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे.. 

ऊठ खेडुता पुन्हा एकदा झाडूनिया घोंगडी,
ऊठ मजूरा पुन्हा मारण्या आघाडीवर उडी,
एकजूट ही पाहून पडतील अन्यायाला तडे,
समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे..

💐🚩मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩💐

Thursday, 18 February 2016

जल स्थल अंबर दे ललकार ! शिवछत्रपतींचा जयजयकार !!





काळाच्या पेठा-यात दडलेली रत्ने ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. महाराष्ट्राच्या मातीतील 'नर'रत्नांची सर्वांनीच दखल घेतली आहे. अभंगापासुन औद्योगिकतेच्या क्षेत्रात, पाडगावकरांच्या कवितेपासून रंगभूमीच्या कलाकारांपर्यंत... या नररत्नांमध्ये शोभुन दिसणारा शिरोमणी म्हणजे 'शिवाजी महाराज..'
आयुष्यभर जिवाशी खेळणारे एक 'अष्टपैलू' खेळाडू, दुर्जनांचा कर्दनकाळ स्वरुप 'वज्र', 
संतांच्या भुमीतील आधाररुपी वृक्ष आणि प्रेमळ जनतेच्या 'मनामनांत राज्य' करणारा ह्रदयसम्राट..
म्हणुनच तर शिवाजी महाराजांवरील ग्रंथसंपदा विपुल नसली तरी, 'शिवरायांविषयी माहीती नाही' असा एकही नाही.. हेच ह्या शिवचरीत्राचे मोठेपण आहे...





दिपस्तंभासारखी उभी आजही असे शिवशाही..
लोकशाही ही बनुन नाचते पुंजपतींची झुंडशाही..


पुन्हा घेऊनी संकल्प हाती, जेव्हा पूर्ण करू निरपेक्ष कष्ट..
तेव्हाच मिळतो हक्क म्हणाया....
  "महाराज...जय महाराष्ट्र..!"

....बोलतो सत्य जे गमते!




















होतात देऊळे नष्ट
होतात देवता भ्रष्ट
गो-ब्राह्मण ओरडीती
धर्मावरती संकष्ट
न्याय नीती उरली नाही
सारेच भोगती कष्ट

हा घोर मांडीला ज्यांनी
त्यांचिया पुढे जावोनी
देशाभिमान सांडोनी


प्रेमाच्या मंगल माते!
लववेना हे शिर माते !!



तू सांग ?तुझ्या चरणाशी हि तोडून ठेवीन मान
तू सांग ? तात चरणाशी कापोनी ठेविन मान
देश,देव,धर्मासाठी  खड्गावर ठेवीन मान


परि परके सत्ताधारी
गृही शिरोनी झाले वैरी
बघतांच तयाना भारी


सक्रोध वृत्ती मम होते!
लववेना हे शिर माते !!


मी म्हणता "नाही..नाही..!" दरबारी नेले आई !
जो आत शिरोनी पाही, वर चढोनी गेली भुवई !
मुज-याला हात न वाही शिर लववू शकलो नाही !


हे सिंहासन कोणाचे ?
हे वैभव तरी कोणाचे ?
काहूर मनी प्रश्नाचे


अपहारी नृपसत्तेते!
लववेना हे शिर माते !!



एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो !
ढळाढळा आई गे ! रडतो त्वेषाने आणि संचारतो !
झोपेत देशबंधुंच्या दुख्खाने दचकून उठतो ! 


बोलते भवानी “उठ ?”
बोलते जन्मभू “उठ ?”
“धर समशेरीची मूठ !”


अवमानून त्या आज्ञेते!
लववेना हे शिर माते !!



 देशाचा राजा नाही, राजनिष्ठ राहू कैसा ?
धर्माचा राजा नाही, राजभक्त होऊ कैसा ?
या उलट्या बोध गळाते, जीवनाचा अडके मासा !


ज्या शिरी भार देशाचा
ज्या शिरी भार धर्माचा
कर्तव्ये वाहायचा


विसरुनी देशधर्माते !!
लववेना हे शिर माते !



स्वाभिमान सुटला ज्यांचा, देशभक्ती सुटली ज्यांची
कुलकीर्तीचा इतिहास, स्मृती देईल उज्वलतेची
वाढवोत ते ते शोभा,दास्याच्या दरबाराची 


उद्दाम म्हणो कुणी माते,
कि करोत उपहासाते
परि जागोनि स्वत्वाते


हिंदू द्वेषी तख्ताते !
लववेना हे शिर माते !!


सुलतान जाहला क्रुध्द , उमराव जाहले क्रुध्द
जातिवंत झाले स्तब्ध, जनकही होय हतबुध्द
परि तुझी आणि अंबेची, शिरी कृपा असावी शुध्द


मावळचे जमवुनी भाई
स्थापीन मराठेशाही
हलवीन आदिलशाही


बोलतो सत्य जे गमते! 
लववेना हे शिर माते !!

Tuesday, 2 February 2016

...आपलसं ‘सुंदर’ करायचं I





नुसतंच काय असं बसून काठावर,माझंमाझं’म्हणायचं” I
गाठून सूरासवेतळ’, आपलसंसुंदर’करायचं” II धृ II

प्रभात समयी अश्वासवे आम्ही, भूमिकेत शिरतो ‘युद्धाच्या’ ,
उगा मारती वाचाळवीर हे, ‘ढोंगी गप्पा’ विरामाच्या II
‘झुळूकी’बरोबरझंझावाता’ने, साम्राज्याला न्याहाळायचं ,
कधीतरी मग अशा रपेटीस,अश्वावरुनी’ निघायचं II १ II

शब्दच करती प्रकट भाव ते,हस्तनेत्रांचा’ खेळ असे ,
वाटे बहुधा चित्रगृहातील,मुकीआंधळी’ भेळ असे II
करण्या जीवनगाणे सुंदर,आवाजाला ओळखीचं’ बनवायचं ,
द्यायची कामालाबुट्टी’ ठरवून,चहासाठीमगभेटायचं” II २ II

दिवसभराचा प्रवासवेध, लुकलुकत्यानयन’ ता-यांसवे ,
तेव्हाच होती नेत्रांकडूनी, मिटून घेण्याचीआर्जवे” II
हो हो म्हणता हळू हळू मग, डोळ्यांनाहीफसवायचं’ ,
सारून बाजूला कधीतरी मग, झोपेलागुड नाईट’म्हणायचं” II ३ II

माझ्या निरागस शब्दाकारांना,  तुम्ही सदा फक्तवाचायचं’ I
डोक्याने नाहीचावायचं’, पण हातानेउत्तर धाडायचं” II ४ II