Thursday, 23 November 2017

डोक्याचं भजं होण्याच्या आधीचं माझं ‘भाजीपुराण’ आटोपतं घेऊयात म्हणतो..

मी : कसला विचार करतेस आई ?
आई : काही नाही रे बाळाउद्या भाजी कोणती करू ?

परवाच एक नवीन लग्न झालेले मित्रमैत्रिण ह्यावरच बोलत होते.. नवीन-जुनं हा प्रश्न नाही..
भाजी कोणती करू हा जागतिक प्रश्न म्हणून जाहीर करायला हवा खरं तर..

पूर्वार्ध

लहानपणी आपण  एवढी नाटकं केली असतील की काय खायचं ह्यापेक्षा काय नाही खायचं ह्याचीच 
लिस्ट मोठी असेल..
मिक्स भाजी हा आचरट प्रकार मला कधी समजला नाही.. मिक्स करावं इतकं समजतं.. 
बनवणाऱ्याला 
पण काय काय करावं इतकं समजू नये ?
स्वयंपाक बनवताना आमच्यात चवीनुसार मीठ घालतात..  काहीजण तर बटाटे किंवा शिमला (ढब्बू.. ही कुठे वापरावी हेसमजत नसेल म्हणून नाव पडलं असावं कदाचित ) मिरची..
ज्यांना वांग्याचं खूप काही सोसावं लागलं असेल त्यांनीच वैतागून 'पुराणातील वांगीहा शब्दप्रयोग 
भाषेला दिला असावा..
रानभाज्या खाताना पाहून नेहमी वाटायचंअरे आम्ही सिंहाचे छावे काय अन् काय  तुम्ही आम्हाला 
गवत खाऊ घालताय ?
मला तर असं वाटायचं की माणूस जन्मताच 'कर्मघेऊन येत नाही.. 
मेथी आणि भेंडी घेऊन येत असावा.. सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेल्या अगदी..
शाळेतही मग ' माझी आवडती भाजी किंवा भाजीशाप की वरदान ?' 
हेच विषय जणू निबंधाला येतात की काय अशी धास्ती वाटायची.. 
लग्नमुंजीउत्सवात आहेर स्वीकारले जाणार नाहीतपण भाज्या चालतील अश्या सूचना छापू लागले 
तर..

तिसरे महायुद्ध अटळ तेही भाज्यांमुळेच असे जाणकारांचे मत..
खूप खूप खावे परी भाजीने तोंडात चव रुपी उरावे..!! सुरण,शेपू ह्या उग्रवासाच्या भाज्या
ह्या प्रकारातल्याच 

प्रश्न जेवढे अटळ तेवढे आम्ही सोडवण्यात माहीर..
कधी काय तर आज मी फक्त वरण भातच जेवणार आहे.. 
कधी तर सार्वजनिक पंगतीत गेल्यावर बाजूला ज्याला जी भाजी आवडते, 
त्याला सोबत घेऊन बसणे
कधी कधी शेजाऱ्याच्या ताटात त्याचे लक्ष नसताना आपली  शिवलेली वाटीतली भाजी घेऊन त्याची भाजी वाढविणे,कधी कधीतरी द्रोणाखाली भाजी लपविणे 
आणि ताटं उचलण्यास मदत करणे , 
जेणेकरूनघरकामास मदत करतो हा बाळ”कौतुक होतेच..  

उत्तरार्ध

समजायला लागल्यापासून,
काही भाज्या चवीला कच्या म्हणूनही छान लागतात.. ज्या आवडत नाहीत त्या
भाज्या भातात मिक्स करून खाव्यात..
पण भाजी पोटात जावी हे सत्य नाकारता कामा नये..
मुळात भाजी वाईट नाहीती कशी
ते बनवणा-यावर  अवलंबून आहे बरं..
बनवायला लागल्यावर त्यातली खरी गंमत कळून येतेमग साधनं कमी असली तरी चालतात 
त्यात मन असलं की पदार्थसुरेख होतात.. 
मग ते टोकेरी काठांच्या ग्लासाने केलेली कोबीची भाजी असो वा उपलब्ध साधन नाही म्हणून 
बारीक चिरलेल्यागाजराचा हलवा असो.. किंवा बरंच काही..
मुखावाटे पदार्थ पोटात गेले की हृदय तृप्त करतात.. 
मग बनविण्याची पद्धतठिकाणंप्रदेश हे सारं दुय्यम ठरतं..
'डोक्याचं भजंहोण्याच्या आधीचं माझं भाजीपुराण आटोपतं घेऊयात म्हणतो..

बाकी हल्ली कुठली भाजी खात नाही असं होत नाही,
Arranged marriage असो किंवा Love marriage असो
समजून घेऊन,सहवासानेविश्वासाने जशी त्यातली गोडी कळते मग संसार मुरत जातो 
तीच गोष्ट भाजीची..

कारण माणसाचं पोट हे प्रेमाने भरतं.. मग जेवणाने !! 
हेच यशाचे गमक






No comments:

Post a Comment