कविता म्हंटलं की त्यात दिसून येतं कविचं अंतःकरण..भाषा जात देश ह्यापलीकडे जाऊन व्यक्त होते ती कविता.मुळात समुद्र हा अथांग असतो जितकी नजर पोहोचेल तितकाच जो नजरेत साठवता येतो.तसाच हा ज्ञानाचा महासागर. त्यात असलेली ही नररत्ने. दृष्टीला जेवढं दिसलं तितकंच वर्णन करता येईल असा टाकलेला हा दृष्टिक्षेप.ज्यांच्या एका नाटकातील चौथ्या अंकातील एका व्यक्तीरेखेचे वर्णन पाहून ‘गटे’सारखा प्रतिभाशाली कवी सुद्धा आनंदाने नाचतो असा 'सरस्वतीचा उपासक' म्हणजे कवी कालिदास !
मेघदूतातल्या दुसर्या श्लोकातील शेवटच्या दोन ओळी -
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।
अशा आहेत. यावरून आषाढ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी, कालिदास जयंती म्हणून साजरी केली जाते.
संस्कृतमध्ये एके ठिकाणी काव्याचे दोन प्रकार वर्णिलेले आहेत.. एक म्हणजे काही कविता.. द्राक्ष जसे तोंडात टाकताच विरघळते तसेच कवितेच्या साध्या शब्दांतून त्याचा अर्थ समजतो.. दुसरा म्हणजे नारळातील खोबरं हवं असेल तर तो फोडावा लागतो तसंच ‘अश्या’ कविता समजून घ्याव्या लागतात..
कल्पनाशक्तीच्या जोरावर नुसते साहित्य उभारणारा कवी नसतो. मृत माणसाला देखील आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर जिवंत करणे हेच खरे कवीचे वैशिष्ट्य असते. काल्पनिकपण
जरी असले तरी साहित्यातून सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास घडविण्याचे कौशल्य कवींमध्ये
असते
मोजक्या शब्दांत खोल अर्थाने भरलेली रचना करणारा खरा कवी असतो..
आख्यायिका:- कालिदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता. त्याची पत्नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती. लग्न झाल्यावर त्याला त्याच्या पत्नीने विचारले :
अस्ति कश्चित वाग्विशेषः? (वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे काय?).
कालिदास या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. पत्नीचे बोलणे अपमास्पद वाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर त्याने पत्नीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ’अस्ति’, कश्चित’ आणि ’वाग्’ या आरंभीच्या तीन शब्दांनी सुरू होणारे साहित्य रचले.
’अस्ति’पासून - अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः । पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥ ...कुमारसंभव
’कश्चित्’पासून - कश्चित्कांता विरहगुरुणां स्वाधिकारात्प्रमत्तः.। शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ॥...मेघदूत
’वाग्’पासून - वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ ...रघुवंश
’वाग्’पासून - वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ ...रघुवंश
साखर खाल्ल्यावरच जशी साखरेची गोडी कळते. तीच गोष्ट कालिदासाच्या
साहित्याची.
रामराज्य
एका पिढीचे काम नाही त्यासाठी ध्येयनिष्ठ पाच पिढ्यांचं तप असावं लागतं. रघुवंश (काव्य) मध्ये अश्या रघुवंशाचं
इक्ष्वाकु वंशातील दिलीप ते अग्निवर्ण अशा राजांचे चरित्र आले आहे. रघू या प्रजाहितदक्ष राजाचे विशेष वर्णन आहे.
रघुवंशाच्या पाचव्या सर्गात वरतंतू ऋषी (University Dean) आणि कौत्स (विदयार्थी) यांच्यातील संवाद आहे. त्यातून
केवळ सुविधा आणि सवलतींवर नव्हे तर संस्कार मूल्य आणि मेहनतीच्या जोरावर
असलेलं तपोवनातील शिक्षण आणि त्यांतून घडणारे शिष्य ह्यांचे वर्णन दिसून येते तेजसां हि न वय: समीक्ष्यते म्हणजेच जे तेजस्वी
आहेत त्यांच्या वयाचा विचार करण्याची जरुरी नाही. असे राम लक्ष्मण जेव्हा
विश्वामित्रांसोबत जातात तेव्हाचे वर्णन आहे कालिदासाच्या रचना ध्येय देणाऱ्या आहेत.
शकुंतलेचं कुमारी, पत्नी, माता अवस्थेचे सुंदर वर्णन अभिज्ञानशाकुंतलम्
(नाटक) मध्ये पहावयास मिळते.रानावनात वाढलेली, सदैव निसर्गाच्या सानिध्यात असलेली, कौमारवस्थेत असलेली निर्मळ अंतःकरणाची शकुंतला.. शहरात वाढलेला, राजनीतीत मुरलेला आणि व्यवहारात अगदी कुशल असलेला दुष्यंत.
सहजच त्याने आदर आणि व प्रेम दाखविल्यावर तिला
त्याची लागलेली ओढ. ह्या अनुभवासंबंधी ती विचारणार कुणाला? चकाकतं ते सोनं असं
समजुन घडलेला पुढील प्रसंग तारुण्याच्या सुरवातीला भावनेने अंतःकरण भरलेले
असल्याने काय चूक काय बरोबर हा निर्णय घेणे कठीणच असते अशावेळी चूक होऊ नये
म्हणुनजवळच्यांनी काळजी घेणे जरुरी असते. त्यानंतर दुष्यंतचाशकुंतलेबद्दलचा
पूज्यभाव निर्माण होण्याचा प्रवास.. शकुंतला.. मुलगी पत्नी माता ह्या तिन्ही
रूपांत खरंच वाचण्यासारखे आहे वर्णन. 'यदिच्छामि ते' तदस्तु असा गोड आणि अर्थपूर्ण आशीर्वाद कण्व देतात.
प्रत्येक ऋतुंचा झाडे, वेली व पशू-पक्षी यांवर होणारा परिणाम ऋतुसंहार (काव्य) मध्ये वर्णिलेला आहे.
कुमार कार्तिकेयाच्या जन्माद्वारा वैवाहिक जीवनाचे तत्वज्ञान कुमारसंभवम् (काव्य) मध्ये समजावले आहे
‘मेघदूता’त (खंडकाव्य) वियोगामुळे व्याकूळ झालेल्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर पाठविलेला संदेश म्हणजे कालिदासाच्या प्रतिभेचा विलासच होय.
विक्रमोर्वशीयम् (नाटक),शृंगारतिलक (काव्य),गंगाष्टक (काव्य),मालविकाग्निमित्रम् (नाटक) ह्या कलाकृतींचाही आस्वाद एकदा तरी घ्यायला हवाच.
प्राचीन भारतात स्त्रियांना गौरवाचे स्थान होते. केवळ स्त्री-समानतेची भाषा शिकवणा-या ढोंगी पंडितांना सांगायला नक्कीच आवडेल की समानतेची भाषा भारतात नव्हतीच; तर स्त्रियांना पुरुषांपेक्षा आदरयुक्त स्थान होते.. कालिदासाच्या साहित्यांत वर्णिलेल्या स्त्रिया ह्याची साक्ष आहेत.
शब्द,अर्थ,अलंकार,रस
या सर्वदृष्टीनीं कालिदासाचे काव्य समृद्ध आहे ह्यात काही शंकाच नाही. असो ! ह्या चारही गोष्टींवर विस्तृत विचार
करण्याची आज वेळ नाही..
सहजप्रेरणा,प्रतिभासंपन्नता,निरीक्षणशक्ती
अशा कित्येक पैलूंनी काव्याला केवळ स्पर्श नव्हे तर वर्धन करण्याचे कर्तृत्व
कालिदासाचे आहे.
कवी
म्हणुन चार शब्द जोडणारे अथवा आपण कवी आहोत असा भ्रम असणाऱ्या सर्वांसाठी
कालिदासाचा दंडक येथे नमूद करावासा वाटतो,
पुराणमित्येव
न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम I संत: परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढ:परप्रत्ययनेयबुध्दि:
II
अर्थ
: केवळ काव्य जुने आहे म्हणुन चांगले होत नाही आणि नवें आहे म्हणून तें वाईट होत
नाही.चांगली माणसे ते परीक्षा करून त्यांतील उत्तम कोणते ते ठरवतात. मूर्ख माणसे
मात्र दुसऱ्याच्या स्वार्थी अभिप्रायावर अवलंबून राहतात.
अर्थात
उत्तम काव्य असल्यावर परीक्षणाचे भय रहातच नाही.
कालिदासाचे
साहित्य थोडक्यात मांडण्याचा हा अट्टाहास देखील नाही. त्याच्या साहित्यात एकेका ओळींत व्यक्ती,
राष्ट्र, इतिहास, संस्कृती यांचे गौरवशाली रूप पाहायला मिळते.
साहित्यसूर्याचा
कवडसा माझ्या वाचनखिडकीत डोकावला एवढंच..
No comments:
Post a Comment