आता तिलाही ह्या सगळ्याचा
उबग आला होता.
घराला कंटाळून घराबाहेर
राहणा-यातली ती
नव्हती. जॉबमुळे तिला हे
सारं जमत नव्हतं.
जेवणाच्या अनियमित वेळा, कमी
झोप इ. चा
तिच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम
होऊ लागला होता.
पूर्वी घडणा-या,
आनंद देणा-या
गोष्टी आता होतं नाहीत हा
बदल जाणवायला लागला
होता.
दिप्ती येणा-या प्रत्येक
सुट्टीचे फिरण्याचे त्यांचे फॅमिली प्लान्स मला सांगत होती.
शर्वरी ती तिच्या आजी-आजोबांकडे
वीकेण्डला जाऊन कसे नवनवीन पदार्थ शिकून येते हे सांगत होती.
जॉबमुळे वेळ मिळत नाही
हे मला ठाऊक होतं; पण ब-याच वर्षात ऑफिस सुटल्यावरही वीकेण्डला मी मनमोकळेपणाने कुठे
फिरायला गेल्याचं, भूषणशी गप्पा मारल्याचं मला आठवत नव्हतं !! आज सर्वांशी बोलताना
मला जाणवलं की इतरांकडे इच्छा आहे, पण सोबत नाही. माझ्याकडे कुणालाही भेटणार नाही इतकी
छान ‘सोबत’ही आहे, ‘साथीदार’ही
आहे, पण ‘इच्छा’ माझीच नाही. किती महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे माझं. “शहाणपण
नेहमी उशिरानेच यावं हिचं नियती असते का..?” हा विचार
करतच मी घरी पोहोचले. मला स्वत:च्याच लक्षात नव्हतं की माझा वाढदिवस आहे ते..
माझ्या आवडीचं जेवण,
केक, आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या कुटुंबियांसोबत भूषणने आमंत्रित केलं
होतं, ‘तेही’ मला न सांगता. वाढदिवस
दरवर्षीच येतो पण आज माझ्या चेह-यावर मात्र हसू होतं आणि भूषणचं खूप सारं कौतुक. सगळे
निघून गेले.
झोपण्यापूर्वी तिला
B’day गिफ्ट घेऊन मी गेलो. पाहिलं तर ती उशी मांडीवर घेऊन भिंतीला टेकून बसली होती.
पाणावलेले डोळे उघडे होते. मात्र कसल्याशा
विचारात ती गढून गेली होती. आज सर्वांसमोरही तिचं वागणं थोडं वेगळं आहे, असं मला जाणवलं.
काहीतरी ‘तिचंच’ सुरु आहे असं मला समजलं.
माझं कुठेच लक्ष नव्हतं,
वाढदिवस झाला तशी मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले..
सारं वैभव माझ्यापाशी
होतं; पण समाधान नव्हतं. मला अचानक सारं आठवलं..
भूषणशी झालेली पहिली
भेट,
बसने प्रवास करताना
एकमेकांना लागलेले धक्के,
सप्तपदी घेताना त्याला
माझं आवडलेलं लाजणं,
एकदा लस्सी पिताना
माझा चेहरा पुसतानाचा त्याच्या चेह-यावरील भाव,
चालत बोलत असताना कटाक्षाने
मन लावून पायातील पैंजणांचा आवाज ऐकणारा तो,
मी कधीच रडू नये म्हणून
नेहमी हसवणारा माझा जोकर,
सोबत होतं मला वेळ
न देता आल्याचं शल्य..
अगदी लग्नानंतरही मला
दोष न देता स्वत:च सहन करणारा माझा प्रिय सखा..
खूप कारणं होती जवळ
जाण्याची.. पण मीच का दूर राहिले ?
इतक्यात तिची नजर माझ्याकडे
गेली. दाटलेलं आभाळं, सुचलेले शब्द, भावनांची गर्दी..सारं काही अगणित ! नवनवीन कल्पनांना
ओढ पावसाचीच होती. तिने माझा हात हातात घेतला आणि तिच्याजवळ बसवलं. फार काही अपेक्षा नव्हत्याच, व्याकुळ नजरेने
माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. जणू काहीसं स्वत:चच प्रतिबिंब उमटलं होतं तिच्या
चेह-यात.
'मनात' स्मृतींची कोलाहल
होत असते, 'विचारांत' सतत वादळे निर्माण होत असतात आणि त्यामुळेच 'डोळ्यांत' पाऊस निर्माण
होत असतो. ती माझ्या मिठीत ओक्साबोक्शी रडत होती. सरसरणा-या वा-यांतून, गडगडणा-या ढगांतून
आयुष्यात 'नव'निर्मितीच होत असते. तिचं
ते रूप डोळ्यांसमोर समोर होतं. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. सा-या दुःस्वप्नांना
निरोप देऊन, सूर्य आजही उगवत होता.
आयुष्यात चढ-उतार असतातच
पण त्यातही सुखाच्या आशा पल्लवित करणारा हा पाऊस मला दिलासादायक वाटला.
बदललं काहीच नव्हतं,
तरीही आदर्श न मानता 'आदर' करायला, तोडण्यापेक्षा 'जपायला', नेहमीच बोलण्यापेक्षा
'ऐकायला', समजावण्यापेक्षा 'समजायला' आम्ही लागलो होतो.
समाप्त
Time-प्लीज
(भाग ३)
No comments:
Post a Comment