कथा सांगण्यापूर्वी प्रस्तावना देऊन ती सांगणं ह्यासारखं दुर्दैव नाही..
तरीही गोष्टी सांगता येणं ही देखील एक कलाच आहे.
प्रत्येकाचं बालपण समृद्ध होत जातं ते कथांमधून.. "चिऊताई चिऊताई दार उघड..." चिऊताईचं दार उघडेपर्यंत कुणा चिमणरावांचं जेवण आटोपलेलं असतं. तर कुठे तान्ह्यानं शिवाजीची गोष्ट सांगून बक्षिसाची ढाल जिंकलेली असते. मुळात कथा मुख्य नसतेच त्यातुन जे सांगायचं असतं ते मुख्य असतं..
यमाशीही संवाद करणारा निर्भीड नचिकेता असेल किंवा उत्तर दिशेकडे अढळपदी विसावणारा ध्रुवबाळ. कालियाच्या डोक्यावर नाचणारा कृष्ण आणि बकासुराला गरगरा हवेत फिरवणारा भीम... यांसारख्या अनेक कथांची भारतीय परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आपणही याच परंपरेतले !! रामायण, महाभारतातल्या गोष्टी तर रंजकच.. साहस, खेळ, भावना, गद्य, पद्य, साहित्य, राजकारण, नीतिमूल्य, सर्वांचा 'महाइतिहास'.
आता तुम्ही ओळखा पाहू ? शाहरियर आणि शाह जमन ह्यांना स्त्रियांचा प्रचंड द्वेष असतो, म्हणून शाहरियर दररोज एका स्त्रीशी लग्न करून त्यांची सूर्योदयाबरोबर हत्या करत असतो, वजिराची एक चतुर मुलगी त्याच्याशी लग्न करते, पहिल्या रात्री गोष्ट अपुरीच ठेवते.. अश्या एक हजार एक रात्री होतात आणि मग राजा तिला जीवदान देतो ह्या अरबी कथा प्रसिद्ध आहेत अलीबाबा आणि अल्लादीनच्या कथा इ.
कथांमध्ये झाडं व प्राणी यांद्वारा मनुष्याशी केलेला संवाद म्हणजेच पंचतंत्र..
उदा. लबाड कोल्हा असं म्हंटलं तरी माणसाने लबाडी करू नये हे अभिप्रेत आहे. आणि ‘शेपटीवाल्या प्राण्यांची सभा’..आठवतेय ना ?
तशीच गोष्ट पुराणांची... पुराणातील गोष्टी महत्वाच्या नसून त्यातील सारांश महत्वाचा आहे हे बऱ्याचदा विसरायला होतं. एखादं तत्वज्ञान सोप्प्या आणि आवडेल अशा भाषेत सांगणं हे ह्याद्वारे सहज शक्य होते.
इतिहास प्रभावीपणे सांगण्यासाठी ह्या माध्यमाचा उपयोग होतो.. पण इतिहास आणि पुराण यांची गल्लत करू नये हीच माफक अपेक्षा !!
कल्पनाशक्ती वाढविण्यात कथेचा मोठा हातभार आहे हे वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झाले आहे. ‘हॅरी पॉटर’च गारुडही विलक्षण आहे.
शब्दसामर्थ्य वाढविण्याचं प्रभावी माध्यम, ऐकण्याची ताकत वाढविण्याचं साधन, केवळ बालमानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीनां सामोरं जाण्याचं बळ ह्यांतून मिळतं…म्हणूनच म्हणावसं वाटतं येथे ‘गोष्टीं’ची बीजं पेरायला हवीत.. ‘कल्पनेशक्ती’ची पीकं भरभरून उगवण्यासाठी.. !!
कथा मन लावून ऐकणं, त्यानुसार त्यात समरस होणं आणि ती सांगता येणं यासारखं सुख नाही, हे अनुभवल्याशिवाय मज्जा नाही. कथा म्हणजे जीवन नव्हे, पण मन अभेद्य करणाऱ्या या कथांतून असं जीवन जगण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी की त्याचीच कथा भविष्यात गौरवाने सांगितली जाईल.
टिप : गोष्टीं सांगता यायलाच हव्यात हा आग्रह करेनच..
येत असेल तर आनंदच आहे; नसेल येत तर… चल रे भोपळ्या टुणूक टुणूक… सुरवात करावयास हरकत नाही… सुटका मात्र नक्कीच नाही!!!

No comments:
Post a Comment