प्रश्न : एखाद्याला त्याच्या भुतकाळासकट स्वीकारणं सोप्पं असतं ?
कळत-नकळत, अस्पष्ट विचार, स्वभाव,सवयी आणि संबंध ह्यानुसार घडणाऱ्या घटना, कृती ह्यात येतात. याठिकाणी त्या व्यक्तीची आणि आपली आवड-नावड हा मुद्धा लक्षात घेणं महत्वाचं नाही.. तर निर्णय हितकारक आहे की अहितकारक हा मुद्धा लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे.
व्यक्तीला स्वीकारणं हे अगतिकतेने नसावं, कारण विरोध करायला, न स्वीकारायला वेळ,प्रयत्न नाही लागत तर स्वीकारायला प्रयत्न आणि वेळ द्यावा लागतो आणि मोठं मन सुद्धा..
स्वीकारणाऱ्यांची संख्या कमीच असते तशी.. त्यासोबत मुळात हेतू काय आहे हा विचार करायला हवा.
मुळात मानवाचं शिक्षण केवळ चार भिंतीत होत नसतं ! आजूबाजूच्या घटना, माणसं त्यातून येणारे अनुभव यावरही ते अवलंबून असतं.
तंबाखू खाऊ नये हानिकारक आहेअसं पाकिटावरच लिहिलेलं असतं ! पण पिकवलंच नाही तर कुणी खाणारच नाही हे कुणी लक्षातच घेत नाही, अनावधानाने घडलेली चूक असेल आणि त्या व्यक्तीला चूक होऊच न देण्याचं 'कारण' आपल्या त्या व्यक्तीला स्वीकारण्यातून मिळत असेल तर नक्की स्वीकारावं.
खड्यात कुणी पडलं असेल आणि त्याला वर काढायचं असेल तर तो चिखल आपल्यालाही लागतोच, त्याचप्रमाणे चुका केलेल्या माणसाला स्वीकारताना आपल्यालाही त्रास थोडा सहन करावा लागेल ह्याची काळजी घ्यावी. अत्री ऋषींनी पण criminal psychology समजावताना माफी करण्याजोगा गुन्हा असेल तर गुन्हेगाराला सुधारण्याची संधी द्यावी असं म्हंटलं आहे. तीच गोष्ट इथेही लागू पडते. पण उपकाराची भूमिका नसावी.
इतिहासाचा विचार करताना शिवाजी महाराजांनीही धर्मांतर झालेल्या काही लोकांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याचा पराक्रमी निर्णय घेतला होता, रावणाशी लढताना विभाषणाला आपल्या सैन्यात घेणारे राम, माणसं खरोखर बदलतात आणि त्यांना स्वीकारणं ही सोप्पं असतं ह्याची उत्तम उदाहरणं आहेत ही..
क्रिकेट खेळताना कोहली कधीतरी शून्यावर बाद होतो, म्हणून काही तो क्रिकेट खेळायचं सोडत नाही, म्हणूनच एखाद्या व्यक्तीला स्वीकारणं गरजेचं असतं नाहीतर त्या व्यक्तीला जगण्याची, कुणावरही विश्वास ठेवण्याची आशाच राहणार नाही.केवळ स्वीकारणं नाही, तर नातं फुलवण्याची जबाबदारीही आपल्यावरच आहे. Dual personality दोन्हीकडूनही नसावी.
दुसऱ्याची गरज असतेच, म्हणून तर आपण कुटुंबात राहतो ना ? एखाद्याला स्वीकारणं हे लग्नानंतरही येतंच की, कोणत्याही प्रकारातलं लग्न असलं तरी स्वीकारणं हे अधिक महत्वाचं असतं. त्यातही आपण प्रेम असल्यामुळे आपली नावडती भाजीही खातोच की, वधू दुसऱ्या घरात मिसळून जातेच की.. इथेही दुसरी व्यक्ती बदलण्याचा प्रयत्न करत असेल थोडा वेळ द्यावा आणि appreciation नक्कीच करावं.
सरतेशेवटी, निर्णय घेताना एखाद्याची 'आवश्यकता' आणि 'विचारस्पष्टता' असणं गरजेचं आहे. घेतलेला निर्णय Measurable असावा कारण एखाद्याला स्वीकारून जर आपलं मन मरत असेल तर तिथे 'रामराम' करणंच योग्य ! अशा वेळी जो निर्णय असेल तो मान्य करण्याचं बाळ आपल्या अंगी यावं आणि आनंदी शेवट व्हावा हीच प्रार्थना !!

No comments:
Post a Comment