Sunday, 7 August 2016

"...सावधपण । सर्व विषयी ।।"


"पहिले ते हरिकथा निरुपण  दुसरे ते राजकारण 
तिसरे ते सावधपण  सर्व विषयी "

नुकतेच शिवथरघळ-मंगलगड हा प्रवास करत असताना इतिहास-दुर्गप्रेमी श्री संतोष मोरे यांजकडुन शिवकालीन ऐतिहासिक पुलाची माहीती मिळाली.. तसेच आज लोकसत्ताने देखील ह्या पुलाची दखल घेतली आहे..

पार गावचा शिवकालीन पूल

 



महाडजवळील अपघाताबरोबरच आमच्याकडील जुने पूल एकदम चर्चेत आले. त्या चर्चेचा रोख शे-दीडशे वर्षे पाठीमागे ब्रिटिशांपर्यंत पोहोचतो. पण सातारा जिल्हय़ातील प्रतापगडाच्या परिसरात शिवरायांनी बांधलेला एक पूल अद्याप ठणठणीतच नाहीतर तो वाहतादेखील आहे. महाबळेश्वरच्या डोंगरातून जावळीच्या खोऱ्यातील पार या गावाला खेटूनच कोकणात एक वाट उतरायची. तो पार घाट. इतिहासकाळी वर्दळीच्या असलेल्या या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठीच शिवरायांनी प्रतापगड बांधला. या वाटेला पार गावाच्या अलीकडेच कोयना नदी आडवी येते. शिवरायांनी या जागीच कोयनेवर हा पूल बांधला. दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेला चार कमानींचा हा पूल १६ मीटर लांब आणि मीटर रुंद आहे. याच्या खांबांना कोयना नदीच्या उगमाच्या बाजूस मत्स्य आकारात निमुळते रूप देण्यात आले आहे. जेणेकरून ऐन पावसाळय़ातही पुराच्या पाण्याची धार उत्तमरीत्या कापली जाते. या पुलाच्या बांधकामाच्या प्रारंभी स्थापना केलेली गणेशाची मूर्तीही इथे दिसते.
आज या सेतूनिर्माणाला तब्बल साडेतीनशे वर्षे होऊन गेली आहेत, पण आजही हे सारे स्थापत्य ठणठणीत आहे. जावळीच्या खोऱ्यातील आठ-दहा गावांचे दळणवळण आजही या पुलावरूनच सुरू आहे. अगदी छोटय़ा वाहनांपासून ते एसटी बस, जड वाहनांपर्यंत. अनेक संशोधक, अभ्यासक हा पूल पाहण्यासाठी वाट वाकडी करत या पार गावात येतात. ही निर्मिती पाहून थक्क होतात..
०७/०८/२०१६

No comments:

Post a Comment