मैत्रीचे रुप प्रत्येकाच्या मनात असते आपले आपले खास.. मैत्री म्हटलं की आठवतं.. डोळ्यांपुढे उभे राहणारे, जीवाला जीव देणारे, मदत करूनही नेहमी मागे राहणारे सोबती..मित्र काय किंवा मैत्रिण काय..जगण्याचे खरे सौंदर्य हे मैत्रीत आहे..
मैत्री..! कुणाला ती गवसते पुस्तकांच्या पानांत..तर कुणाला ह्या नात्याची हाक ऐकु येते निसर्गात..कुणाला ते भेटतं एखादया कलेत.. तर कुणाशी त्याची गट्टी होते मानवेतर सृष्टीत..
कुणासाठी ते काव्य आहे...
कुणासाठी ती कल्पकता आहे...
कुणासाठी ते चातुर्य आहे...
कुणासाठी ते हास्य आहे...
कुणासाठी तो उपदेश आहे.. परंतु कोवळ्या अश्या अंत:करणात शांतपणे डोकावून पाहिलं ना की जाणवतं..''जीवनाला परीपूर्ण करणारी आपल्याच संस्कारांनी घडविलेली ही उत्कृष्ट चमत्कृती आहे..."
No comments:
Post a Comment