दोन जिवांचंच नव्हे तर दोन कुटुंबांचं मीलन घडवून आणणारा प्रेमाचा धागा म्हणजेच विवाह. सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक यांच्या आशीर्वादाने नव्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी छापलेल्या पत्रिका,पत्रिकांवर नावे कोणाची छापायची, लग्नस्थळ कुठे असावे, दोघांच्या कुटुंबीयांना लग्नस्थळ सोयीचे पडेल का?बँजोवाले, खरेदी, ह्या सर्व गडबडीत अखेर तो क्षण आलाच.. घराला रंगही देऊन झाला होता.आमच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून केळवणही झालं होतच..
नव-यामुलीची कलाकुसर पारखण्यासाठीच म्हणा ना हवं
तर पण बनवलेला रुखवत खुप सुंदर होता. त्यात एक वेगळाच फोटो माझ्या आई-बाबांनी आमच्यासाठी
रुखवतात ठेवायला दिला होता. त्याचा संदर्भ आम्हा दोघांनाही लागत नव्हता. त्याकडे तेव्हा लक्ष तर गेलं
होतंच पण विचार करायला वेळ नव्हता.
गंमत म्हणजे त्या सोहळ्यात नऊवारी साडी,नथ घालून
आलेली ती चिमुरडी,तिच्या मावशीची मुलगी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. तिचं मुरडणं
पाहून सगळ्यांनाच हसू येत होतं.
मग विधीस सुरवात झाल्यावर योग्यसमयी आम्ही उभे राहिलो
आणि मामींनी म्हंटलेली गदिमांची ही मंगलाष्टके विशेष भाव खाऊन गेली.
जवळ जवळ मीलनाचा मुहूर्त
उभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थ
झटपट पट आत विप्र हो दूर सारा
अधीर बहुत झाली, पंख येतील हारा
प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो
हे सत्य ध्यानी धरा
आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती
सदा आदरा
सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्यापित्यांनी
दिले
त्यांचे श्रेय सुखप्रद तुम्हां,
‘कुर्यात सदा मंगलम्’
गुरुजींनी पुढील सुंदर मंगलाष्टक म्हंटल्यावर मला
थोडं हसूच आलं होतं
चांदण्यात चांदणे हे पौर्णिमेचे
लुगड्यात लुगडे ते पैठणीचे
ते लुगडे नेसता मनी हर्ष दाटे
बघुनि समोर नवरा ठेंगणा स्वर्ग
वाटे
त्यानंतर एकमेकांना माळा घातल्यानंतर गुरुजींचा आशीर्वाद
घेताना त्यांचा आग्रहास्तव अवनीने लाजुन घेतलेलं नाव-
हासुनी कळी फुल उमलले, मोहरून
आला सुगंध
'व्योम'रावांच्या सोबतीत गवसला
मज जीवनाचा आनंद..
नेमकं त्या रुखवतात ठेवायला दिलेल्या फोटोत काय होतं हे समजत नव्हतं पण आमच्या एकत्र
येण्याच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांनी आम्हाला दिलेलं एक छोटसं त्यांच्या अनुभवांतून
काहीसं सुचन करणारं एक छानसं असं सांगणं होतं..
‘’सौभाग्याची जाणीव
ठेवुन गरजेच्यागोष्टी प्राप्त करण्यासाठी सोबत येण्यासाठीचे पहिले पाऊल.
नातं म्हणजे केवळ
दोघांचं नव्हे तर कुटुंबासाठी मिळालेल्या साधनांतून सर्वाना जपण्याची जाणीव
वेळ कुणासाठी थांबत
नाही. योग्य वेळी योग्य मार्गाने कमावलेल्या पैशानेच सुखप्राप्ती करावी ही समज
सुख मिळवणं म्हणजे
नेमकं काय ? प्रत्येकाची वेगळी आणि स्वतंत्र अशी व्याख्या असली तरी ते मानण्यात आहे
त्या पेक्षा मिळवण्यात आहे. केवळ सफल होण्यापेक्षा
समाधानी होण्यात ते आहेच.
विवाह केवळ बंधन
नव्हे तर आपले विचार, परंपरा जपणे, त्यासाठी स्वप्नांना बळ देण्यासाठी पुत्रप्राप्ती
आयुष्य हा क्षणाक्षणांचा
उत्सव आहे फक्त तो मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि लहानग्यांसोबत धमाल मस्ती करता करता
साजरा करता यायला
हवा.
आयुष्यात फक्त
करार नाही, केवळ समाजबंधन म्हणुन नाही तर येणा-या सुख-दु:खात दोघांच्या 'सहयोगा'तुन
धैयाने जीवन जगणे
वधुसमावेत तांदळाच्या
सात राशींवर पाऊल ठेवताना तिच्या माझ्यासंबंधी अपेक्षा तसेच माझी तिच्याविषयी असलेल्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव म्हणजेच
सप्तपदी..’’
आम्हां दोघांनाही त्या फोटोचा उलगडा गुरुजींनी सांगितल्यावर
झाला.. तेव्हा त्या गोष्टीची जाणीव झाली. कर्तव्याचं भान ठेवायला भाग पडणारे आशीर्वादाचे
ते हात आजही प्रेरणा देणारेच आहेत
सर्वाना सन्मानाने,थोड्याश्या आग्रहाने
वाढता यावे म्हणून जेवताना व्हावी संगत.
म्हणून जेवणासाठी आमच्या दोघांच्याही आग्रहाने ठेवली
होती पंगत..
बाबांचे डोळेही पाणावले होते. तिच्याशी नेहमी भांडणारा
तिचा भाऊही आज रडत होता. मग तिला जप असं मला बाबा म्हणाले.. आणि जड अंत:करणाने सगळ्यांचा
निरोप घेऊन भावी आयुष्याची सुरवात करण्यासाठी आम्ही घरी जावयास निघालो.
वाद्यांच्या आवाजात आम्ही हळुहळु घरी पोहोचलो देखील..
तशा आठवणी म्हणा छायाचित्रांच्या माध्यमातून कायमच्या
मनावर कोरल्या जातातच..
क्रमश:
हे
भलते अवघड असते..
(भाग ६)
No comments:
Post a Comment