मी तिला दुस-या दिवशीच भेटून म्हणालो,
“माऊ, तुझं उत्तर मिळालं.. हे बघ”..
‘’दृष्टीतून आश्वासन ,
स्पर्शातुन मायेची ऊब,
चुकांतून समजण्याची वृत्ती,
शरण नव्हे तर समर्पणाचा भाव संपला ना..
तर नात्यांचा श्वास 'Ventilator' लावून देखील टिकत
नाहीत.
म्हणूनच नात्यांचा 'श्वास' जपला कि 'जगण्याचा' त्रास
होत नाही.
संबंध जपताना प्रेमाचंच खतपाणी घालायला हवं;
कारण नात्यांचे वृक्ष असेच बहरतात.’’
ती हसली आणि म्हणाली, “हुशार आहेस.”
एकदा मी माझ्या प्रमोशनची पार्टी दिली. त्यात सर्वांसोबत
मी तिलाही बोलावलं होतं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात ‘साथीदार’ म्हणून तिला
मी पहात होतो. जेवुन
झाल्यावर सर्व निघेपर्यंत मीच डोळयांनी तिला म्हंटल, ‘थांब एकत्रच जाऊ.’
मग आम्ही निघालो. ती म्हणाली, “तुझा walkman सुरु
आहे का रे ?” मी म्हटलं, “नाही.”
ती म्हणाली, “गाणी ऐकायची आज इच्छा होती.” मग मीच म्हटलं, “एवढंच ना ? त्यात काय ? आपण भेंड्या
खेळू की.”
ती म्हणाली,”चालेल..” मग मीच तिच्या मनाचा अंदाज घ्यायचा ठरवला.. आणि तिच्याच
आवडत गाणं म्हणालो :
“कोई उल्फ़त की नज़र ज़रा फेर दे, ले ले दो चार आने
जिगर मेरा फेर दे.”
लगेच ती म्हणाली, “ऐसे नहीं चोरी, खुलेगी तकरार से,
चलो चलो थाने बताएं जमादार से..”
पुन्हा मी: “जाने कहाँ मेरा जिगर गया जी,अभी अभी
यहीं था किधर गया जी ?”
ती : “किसी की अदाओं पे मर गया जी,बड़ी-बड़ी अँखियों
से डर गया जी.”
खूप हसत हसतच आम्ही म्हणत होतो.. सगळे आमच्याकडे
पाहून हसत होते. पण आम्हाला त्याची पर्वा नव्हतीच.
मग मी पुन्हा म्हणालो : “अगर मैं कहूँ, तुमको जब
देखूं लगती हो जैसे नयी, होंठ हैं पंखड़ी फूल की,
आँखें
जैसे जुगनू चमकते हुए, सोचे मेरा ये दिल धड़कते हुए,
अगर
मैं कहूँ, ये जो चेहरा है,जैसे कोई चाँद है, तो क्या कहोगी..!
ती : मैं तुमसे कहूँगी, मुझको भूले से भी चाँद तुम
ना कहो,चाँद में तो काई दाग हैं,
मुझे फूल ना कहना, वो मुरझाते
हैं, जुगनू भी ना कहना, वो खो जाते हैं..!
थोडसं वेगळं म्हणून माझ्या आवडीचं गाणं म्हणालो :
“ऐ
रात इस वक्त आँचल में तेरे जितने भी हैं ये सितारें,
जो दे दे तू मुझको, तो फिर मैं लूटा दू,किसी
की नज़र पे ये सारे,
कहो
के ये रंगीन सपनें, सजा के मिटा तो ना दोगे,
अगर
हम ये पूछें के दिल में, बसा के भूला तो ना दोगे..”
तर ती मुद्दाम म्हणाली: “प्यार में सोचिए तो बस गम
है,प्यार में जो सितम भी हो कम है,
प्यार
में सर झुकाना पड़ता है,दर्द में मुस्कुराना पड़ता है,
ज़हर
क्यों ज़िंदगी में भरते है, जाने क्यों लोग
प्यार करते हैं ?
जाने
क्यों वो किसी पे मरते हैं ? जाने क्यों..?
मग
मात्र मला तिचा जरा राग आला होता.. पण आनंदाचा दिवस आणि तिही सोबत म्हणून म्हणालो,
“उशीर होईल तुला घरी जायला; निघुयात आपण.” तर नेहमीप्रमाणे हसुन “हो” म्हणाली.
पुढच्याच
महिन्यात तिचा वाढदिवस होता. पावसाळ्याचेच दिवस होते म्हणा. तिची इच्छा होती की, पूर्ण
दिवस मीच तिच्यासोबत घालवावा. उत्तर अजून तिने दिलं नसलं तरी तिच्यासोबत, तिचा वाढदिवस
साजरा करावा, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. म्हणून क्षणाचाही विलंब न करता मी
‘होकार’ दिला. अखेर वाढदिवसाचा दिवस आलाच.. मला black कलर आवडतो, म्हणून तिने
black ड्रेस घातला होता आणि तिला निळा रंग आवडतो, म्हणून निळ्या रंगाचा शर्ट. फारच
आनंदी दिसत होती ती.
तिनेच
खुप तयारी करून ठेवली होती. काय करायचं, कुठे
जायच.. संध्याकाळी sunset पहायला आम्ही पोहोचलो. आणि तिच्यासाठी मी स्वतः पहिल्यांदाच
बनवलेली एक कविता तिला ऐकवली.
होती ‘गप्पा’ष्टकें जरी तरी नेमके ‘ते’ राहते
करुनी ‘भाषांतरे’ मौनाची मज ‘लिहावे’ वाटते
वाहतो वदनातूनी तुझ्या ‘ओढा’ शुभ्र धारेसारखा
ठेविशी ते शब्द जपूनी हात ‘आखडता’ जसा
पाहता ‘रिमझीम’ शब्दांची तुझ्या मौज भारी वाटते
‘थाप द्यावी’ ठेऊनी कुठे सारखे मज वाटते
देव’वेडे’ करती बोल्या ठेऊनी ‘पेढे’ पुढे
मी असा की भक्त ज्या हे ‘वाटती’ ‘आढे-वेढे’
‘बोली’ ठेवावी पुढे, ना मनी कधी दाटते
‘भरली’
श्रद्धेने पुरी इच्छा ‘पुरेशी’ वाटते
उजळले
आहे कसे बघ ‘इंद्रधनू’ क्षितिजावरी
‘उजळूनी’
यावे तसे सारे क्षणी ‘पैलातूनी’
व्यूह
शब्दांचे नको तू ‘गावे तराणे’ वाटते
उघडूनी
तू ‘सांग राधे’ काय तुजला वाटते..
तीर
‘पक्का’निशाने पर लगा था.. ती बोलत होती.. आणि माझ्या मनात तिचे शब्द कोरले जात होते..
“माझ्यासाठी
माझं घर शोधत येणारा..
माझ्या
प्रश्नांना अचूक उत्तर देणारा..
माझी
आवड जपणारा आणि त्यास मनसोक्त दादही देणारा..
माझ्यासोबत
माझ्या घरच्यांनाही मान देणारा.. त्यांची आवड-निवड जपणारा..
अनोळखी
शहरात मला आधार देणारा.. मुंबईदर्शन त्याच्या
नजरेनं दाखवणारा..
मला
कधीच एकटं न पडू देणारा.. माझी नेहमी काळजी
घेणारा..
खरंच
Sorry.. मी थोडासा उशीर केला आहे सांगायला.. पण मलाच नेमकं समजत नव्हतं मनाला ठाम असं
वाटलं मगच मी तुला सांगण्याचा निर्णय घेतला.. मी खुप खुश आहे आज आणि हो.. मला ह्यापेक्षा
अधिक सुंदर जोडीदार मिळणं अशक्य आहे..
हो,
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
माझ्यासाठी
तो ‘खूपच’ आनंदाचा क्षण होता. किती दिवसांपासुन मला ‘जे’ हवं होतं ‘ते’ मला आज ‘मिळालं’
होतं..
मग
काही दिवसांनी आम्ही दोघांनीही घरी सांगितलं, तिच्या घरी विरोध झालाच नाही. माझ्याघरी
तिला बोलावलं होतं. तिला बाबांनी सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. ती तरीही ‘हो’च
म्हणाली. मग बाबाच म्हणाले, “जरा डोळे उघडून बघा इतरांकडे; मग कळेल आपलं आयुष्य केवढं
सोपं आहे. तुम्हाला जाणीव असायला हवी, लोकांना किती त्रास असतो. लग्न, घरच्यांचा विरोध,
आर्थिक , घराचा प्रश्न... तुमच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम नसताना create होण्याची
वाट नका पाहू. लवकर लग्न करण्याचा निर्णय घ्या.”
पुढे
काही दिवसांत जास्त गाजावाजा न करता दोन-चार मान्यवरांच्या उपस्थितीतच ‘साखरपुडा’ समारंभ
‘संपन्न’ झाला.. आता कुठलेच ‘प्रश्न’ नव्हते
कुठलीच ‘कोडी’ नव्हती..
होतं
फक्त ‘ती,मी आणि प्रेम’..!!
क्रमश:
हे भलते अवघड असते..
(भाग ५)
ReplyDeleteसागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी