जिथे आपण लहानाचे
मोठे होतो, जिथे आपणं आपल्या भावना मोकळेपणाने शेअर करतो अशी हक्काची जागा म्हणजे घर.
अशा घराबद्दलच्या भावना ओलाव्यातून वक्त होतात
आणि साकारतं 'कवितेतलं घर..'
Mid pleasures and palaces though we may roam,
Be it ever so humble, there's no place like home;
A charm from the sky seems to hallow us there,
Which, seek through the world, is ne'er met with elsewhere.
Home, home, sweet, sweet home!
There's no place like home, oh, there's no place like home!

एक गंध असतो
घराचा सतत माझ्या सोबत
चालताना,काम करताना मला
सारख्या हाका ऐकू येतात
घराच्या ! रोज धावपळ करून
थकल्यावर, दमल्यावर हक्काची विसाव्याची जागा म्हणजे घर.संध्याकाळी घरी जाताना ते
जणू हात पसरून आईच्या
मायेने म्हणतं,'बाळा,खूप थकला
असशील ना ? ये माझ्या
कुशीत मी तुला थोपटते..
अंगाई गाते..'अशावेळी आपण मूकपणे आपलं अस्तित्व त्याच्या
स्वाधीन करून झोपून जातो
त्याच्या कुशीत,निवांतपणे आईच्या गर्भात असल्यासारखं !
घर.. आपलं हसणं,रडणं,सुखदु:ख पाहत असतं वडीलधा-या माणसांसारखं !
घर.. आपलं हसणं,रडणं,सुखदु:ख पाहत असतं वडीलधा-या माणसांसारखं !
घरालाही
भावना असतात. त्याला त्या व्यक्त करता येत नसल्या म्हणून
काय झालं ? निदा फाजली म्हणतात,
'पत्थरों में जुबान होती
है,दिल होता है
; अपने घर की दरो-दिवार सजाकर देखो !'
पती पत्नी यांनी मिळून उभं केलेल्या घराशी त्यांच्या कितीतरी आठवणी जोडलेल्या असतात. यातलं एक जरी कोणी सोडून गेलं तर मात्र या आठवणींनी मन खिन्न होतं... वैभव देशमुख म्हणतात,'कसा रंग दॆऊ सखे मी नव्याने, अजुनी घराला तुझी याद आहे !' आपल्याला माहित आहेच की, ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती..!’ चंद्रशेखर गोखले एका चारोळीत म्हणतात, 'घर दोघांच असतं ते दोघांनी सावरायचं,एकाने पसरवलं तर दुस-याने आवरायचं'

पण हा जिव्हाळा संपला की मात्र घर बंदिस्त चौकट होते आणि मग घराचीच भीती वाटू
लागते, मग चंद्रशेखर सानेकर एका शायरीत म्हणतात,'पाहिजे होती मलाही ऊब मायेच्या घराची,पण
घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो !' ग्लोबलायझेशनच्या युगात सिमेंटच्या भिंती वाढल्या,पण
ज्या माणसांमुळे घराला घरपण येतं तो माणूस मात्र दूर गेला हे सांगताना सई तांबे म्हणतात,'माझ्या
घराची मुळं सैल होत चालली आहेत,लवकरच आमच्या घराच्या जागी उन्हाचं जंगल होणार..'
ब-याच वर्षांपासून बंद असलेलं घर उदास होतं. घरातली माणसं निघून गेल्याने एकटं पडतं,अंधारात बुडून जातं. अशा घराची भावना अरुण म्हात्रे मांडतात,'घर विलक्षण शांत. मालक निघून गेलेल्या कुत्र्यासारखं, नुसतंच चाटत राहतं काळोखाची बशी ! 'कधी घरावर संकटं येतात मग घर थकतं.. दमतं..कवी ग्रेस ह्या भावना व्यक्त करताना म्हणतात,'घर थकलेले संन्यासी,हळूहळू भिंतही खचते.'
'हे विश्वचि माझे घर..' असं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी 'ग्लोबल' घराची संकल्पना केव्हाच सांगितली आहे.

....आईशी बाळ जसं नाळेने जोडलेलं असतं तसंच आपणही घराशी जोडलेले असतो कायमचे..
जगण्याची उमेद,आपुलकी ते पुरवत असतं नाळेतून.. पण एक घर सोडून नव्या घरी जाताना पावलं
जड होतात. मागे वळून शेवटचं घराकडे पाहताना गळा भरून येतो. पण घर मात्र मूकपणे हात हलवत निरोप देत
मनातल्या मनात रडत असतं... आणि नवं घर मात्र नव्या पिल्लांची वाट बघत, बाहू पसरुन उभं
असतं तयार होऊन... पुन्हा नव्या आठवणींचा प्रवास सुरु करण्यासाठी….
जाता जाता दोन
पंक्ती आठवतात की,
या घरट्यातुन पिलू उडावे दिव्य
घेऊनि शक्ती,
आकांक्षांचे
पंख असावे उंबरठ्यावर भक्ती!!
शेवटी, जिथं
मन सुख-समाधानाने
नांदतं तेच असतं ना..
'आपलं घरं..’!!!
विशेष आभार - कवी आणि कवयित्री.
(शब्दांकन - प्रणव,प्रियांका,प्रकाश,मयुर,कौस्तुभ.)
No comments:
Post a Comment