Thursday, 28 January 2016

...अंतरावर लक्ष असू दया !

















भल्या पहाटे पाहणारी 'स्वप्नं' आणि सायंकाळी होणा-या 'स्वप्नपूर्ती'मधील 'साधने'वर लक्ष असू दया..

दुर असणारे 'ओळखीचे' आणि जवळ असणारे 'अनोळखी' यांमधील 'संवादा'वर लक्ष असू दया..

'लॉटरीची फी' आणि 'कष्टाची Price' यांमधील 'आत्मविश्वासाच्या Value' कडे लक्ष असू दया..

जीवननौकेतुन फिरताना 'भावपुर्ण कविता' आणि 'अनुभवसंपन्न धडे' यांमधील 'भरती-ओहोटी'वर लक्ष असू दया..

समाजमंडईत, जीवनव्यवहार करताना अपेक्षांची 'वजनं' आणि ओंजळीतील 'दान' यांमधील 'विवेकरुपी काट्या'कडे लक्ष असू दया..

जीवनाच्या सांगितीक मैफिलीत स्वत:चे 'सूर' आणि सोबतीचे 'ताल' यांमधील नादमय 'लयी'कडे लक्ष असू दया..

पुढील क्षेत्र गिर्यारोहण..
कृपया आरोहण करताना सुखांचे 'कडे' आणि अपयशांच्या '-या' यांमधील 'जीवना'वर लक्ष असू दया..

पुढील क्षेत्र क्रिडांगण..
जीवनकसोटी Match खेळताना स्वत:ची 'बॅट' आणि नियतीचा 'चेंडू' यांमधील 'टप्प्या'वर लक्ष असू दया..

पुढील क्षेत्र कलांगण..
जीवनरंगमंचावर वावरताना 'लेखकाचे पात्र' आणि 'प्रेक्षकांचा नटसम्राट' यांमधील 'स्वत:च्या नायकाकडे' लक्ष असू दया..

'स्थिर' भूतकाळ आणि 'अस्थिर' भविष्यकाळ यांमधील 'कृतीशील,गतिशील' वर्तमानाकडे लक्ष असू दया..

1 comment: