Sunday, 10 January 2016

The Birds wishes it were a Cloud..! The Cloud wishes it were a Bird..!!























ढग म्हणे स्वत:ला,
मला बनायचं आहे पक्षी..
लांबच लांब गाठुन पल्ला,
रेखायची आहे कर्तृत्वाची नक्षी..

पक्षी म्हणे बाळाला तुला,
बनायचे आहे एक सुंदर ढग..
दुस-यांसाठी 'जीवन' देणा-या,
त्या ढगासारखे जग..

अदलाबदली केली तरी
'स्वत्व' कुणाचे सुटत नाही..
कृतज्ञतेचे जीवन जगले तरीही,
'आकाशाचे देणे' फिटत नाही..

No comments:

Post a Comment