हे भलते अवघड असते..
(भाग १)
पात्र : व्योम,अवनी.
मी ‘व्योम’.. मुळचा नगरचा.. पण लहानपणापासूनच भायखळ्यात वाढलेलो.. फारसा गावाशी संबध नसलेला.. नुकतीच TYच्या निकालाची वाट पहात बसलेला.. तसा कमी बोलणारा.. पण मनाने एकदम सरळ.. स्वतःची तारीफ स्वत:च काय करायची ? असो..!
(मनाने नुसतं सरळ असून थोडीच चालतं ? त्यासाठी हुशार देखील असावं लागतं.. असं माझ्या आईचं मत, माझ्याविषयी असलेलं ..)
ती..
‘अवनी’..देवगडची.. कोकणातच लहानाची मोठी झालेली.. शांत दिसत असली तरी बोलक्या स्वभावाची.. Pg ची एक्साम देऊन मुंबईत चार दिवस आत्येकडे फिरायला आलेली..घरी जाताना मला रेल्वेप्रवासात भेटलेली एक गोंडस परी..

(मुलीने कसं मर्यादेत रहावं-वागावं, उगाचच हिने मुलांबरोबर हसू-खिदळू नये, असं तिच्या आईचं मत, तिच्याविषयी असलेलं..)
कोंकण.. वर्णन करावे तेवढं कमीच.. खूप सारं ऐकलेलं होतच.. पाहण्याचा योग कित्येक वर्षांनी येणार होता.. गाड्यांना बाराही महिने गर्दी असते, म्हणून Reservation शिवाय जाऊच नकोस, असा मौलिक सल्ला शेजारच्या मालवणी काकूंनी दिला होताच.. सगळे आपापल्या कामात busy असल्याने मी एकटाच कोकणात जायला निघालेलो.. ठरल्याप्रमाणे कोकणकन्याने जायला CSTM ला मी पोहोचलो देखील.. अखेर प्रवास सुरु झाला..
शेजारी दोन वयोवृद्ध दाम्पत्य बसले होते आणि समोर दोन्ही समवयस्क स्त्रिया गप्पा मारत बसल्या होत्या.. मुळातच मी अबोल असल्याने तिथे काही बोलता येईल, असं वाटतं नव्हतं..आणि ५-६वर्षांपूर्वी Moblieचंही एवढं वेड नव्हतं.. म्हणून माझ्या प्राणाहुनही प्रिय असणा-या Walkman मध्ये गाणं ऐकत मी बसलो होतो.. 'जिंदगी एक सफर..'ने सुरवात झाली होतीच.. काही गाणी ऐकता ऐकता गाडी स्टेशनपाशी थांबली.. स्टेशन होतं 'ठाणे'.. गाणं नेमकं सुरु होत 'एक अजनबी हसीना से मुलाकात..' अन् 'कोकणकन्ये'चं दर्शन झालं.. मीही बघून न बघितल्यासारखं केलं होत अन् गंमत म्हणजे तिनेही.. ('तेरी भी चूप और मेरी भी चूप'..) गाडी पुन्हा सुरु झाली.. शांततेचा भंग करायला TC काका आलेच होते.. सर्वांची तिकीट चेक झाली.. तिने तिच्या पर्समध्ये तिकीट ठेवताना, ते पडलं.. आणि मदतीस सदैव तत्पर असा 'मी'.. मी ते उचलून तिला परतही केले.. तेवढ्यात तिचे नाव वाचण्याचा अतिउत्साहीपणा मी केला होता आणि तो तिच्या नजरेतून सुटला नव्हता.. अर्थात ती धन्यवाद म्हणालीदेखील.. हळूहळू एकमेकांची ओळख वगैरे करण्यात आजी-आजोबांनी हातभार लावला होताच.. सह-प्रवासी वयस्कर असल्याने, आम्ही दोघांनीही वरती जाण्याचा निर्णय घेतला..
Walkmanची गाणी केव्हाच बंद केली होती, कानात आपोआपच ऐकलेली गाणी वाजत होती..

तिनेही 'राधा' नावाचं पुस्तक वाचायला घेतलं होतं.. थोडीफार शैक्षणिक माहिती, आवडी-निवडी अशी ओळख तर खालीच झाली होती; काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.. "कुठलं पुस्तक आहे?".. तर ती म्हणाली, "कवितासंग्रह आहे.. मला कविता फार आवडतात.." माझा आणि अवांतर वाचनाचा तसा काही संबंधच नव्हता, हे माझ्या बोलण्यातून तिला समजलं होतच.. मग वाचनाचा दुवा साधूनच दोघंही अंर्तमन वाचण्याचा प्रयत्न केव्हा करू लागलो, हे समजलेच नाही.. तिचे विचार खूप प्रगल्भ होते.. मी गोंधळलेला.. तरीही तिच्यासोबत संभाषण करता करता मोकळा होणारा.. एव्हाना खालून "light बंद करा रे" असा आदेश आजोबानी दिला होता.. प्रवासात तिला झोप येत नाही हे तिने मला 'सांगितलं होतं' आणि मी स्वतः झोपायचं नाही, असं 'माझ्या मनाला'..
नंतर बराचवेळ शांत राहिल्यावर तिने माझा Walkman मागितला.. थोडावेळ गाणी ऐकून मग ती म्हणाली: "तुझी गाण्यांची choice सॉल्लिड आहे.. ही गाणी माझीसुद्धा आवडती आहेत.."
मग मला कंटाळा येऊ नये म्हणून, तिने मुंबईला चार दिवस काय केलं हे सांगितलं.. नंतर तीही कधीतरी कविता करते असं सांगितलं ! मग गप्पा मारता मारता चार वाजले असावेत अन् माझा डोळा लागला होता.. सकाळी उठल्यावर.. पुन्हा आम्ही खाली बसलो.. तिच्या शेजारचे रात्रीच उतरले होते.. म्हणून तिने शेजारी बसायला बोलावले.. एरवी विंडो सीट न सोडणारा मुंबईकर मी.. सहज हो म्हणायच्या आधीच उठून तिकडे कधी बसलो, हे मला देखील समजलं नाहीच.. हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता, तरीही खूप काही शिकवणारा होता.. आपुलकीने 'समजावणारं' आणि मोकळपणे 'व्यक्त' होता येईल असं, प्रथमच मला कुणीतरी 'आपलंस' सापडलं होतं..
तिच बोलणं 'सहज' होतं, नजर 'आश्वासक' होती.. कितीही चांगला फलंदाज असला, तरी तो slower one ला बळी पडतोच.. तसा कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारा मी.. सुखद सहवासामुळे तिच्या प्रेमातच पडलो होतो.. तिच्या मनात काय होतं (!) हे मला माहीत नव्हतं ; पण.. तिला सोडून कुठेच जाऊ नये, असं मात्र वाटतं होतं.. ती कुडाळला उतरणार होती आणि मी कणकवलीला..
माझं स्टेशन यायला तासभर वेळ होता.. मग मला काहीतरी हरवत चाल्लय की काय असं वाटतं होतं.. म्हणून मीच तिला विचारलं: "काय मग ? आमच्या मुंबईला परत कधी येणार ?" ती म्हणाली : "माहित नाही." तेव्हा मात्र मी थोडासा नर्व्हस झालो होतो ; कारण पुन्हा कधी भेट होईल हे सांगता येत नव्हतं.. आणि आत्ताच प्रेमाविषयी व्यक्त होणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता.. शेवटी मी न राहवून सांगितलंच.. "मी कोकणातला नाही.. कोकणातली माणसं छान असतात, साधी असतात, असं 'ऐकलं होतं ते आज अनुभवलंदेखील..' मी फिरायला आलो आहे.. मग पुन्हा कधी भेटायचं ? भेटायचं ना ?"
एवढ्या प्रवासात कधीच तिच्या मनाचा अंदाज न घेणारा मी.. केवढी बडबडणारी ती.. ह्या प्रश्नावर गप्प बसली होती.. मग मीही फ्रेश व्हायला गेलो आणि आल्यावर सामानाची आवराआवर करायला घेतली होती.. ती देवबागला राहते.. एवढं मला तिच्याशी बोलताना माहित पडलं होतं..ती तिच्या डायरीमध्ये काहीतरी लिहीत होती..
आता 'पुन्हा कधी भेट होईल' ह्या विचारतच मी होतो.. त्याकाळी काही मोबाईल नव्हते.. आणि घरातही संपर्क ठेवता येईल असे आमचे कुटूंबीयही नव्हते.. ‘चांगले प्रसंग’आयुष्यात ‘फक्त अनुभव’ म्हणूनच राहतात आणि ते जगता येत नाहीत, ‘असं काहीसं’ माझ्या मनात आलं होतं.
अखेर माझं स्टेशन आलं.. नकळतच म्हणा किंवा जाणून-बुजून, तीही मला सोडायला दारात आलीच होती.. तिने तिच्या डायरीचं एक पान फाडून मला दिलं होतं..आणि त्यात काही ओळी लिहिल्या होत्या.. आणि म्हणाली : "पुन्हा भेटू ! लवकरच.."
मी तिच्याकडे पाहतच होतो.. तिचं काळजीमिश्रित हास्य मनाला बोचतही होतं.. तरीही मी "Bye, काळजी घे.." केलं देखील आणि निघालो सुद्धा.. ती दारात टाटा करत तशीच उभी होती.. ट्रेन निघून पुढे गेली होती.. मी माझ्या ठिकाणी पोहोचलो होतो.. त्यादिवशी फिरण्याचा आनंद तसा नव्हताच.. रात्री झोपही येत नव्हती.. डोळे मिटले तरी तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता.. खरंय.. प्रेमात पडण्यासाठी एक क्षणही पुरेशा असतो.. मग तिने दिलेला.. तो जपून ठेवलेला कागद मी उघडला.. ज्यात लिहिले होते..
''नित्याचाच जीवन एक प्रवास..
जणु तुझ्या येण्याने फुलला गुलमोहोर..!
रंगले स्वप्न मनी हे प्रीतीचे
गवसला मज तवरूपे चित्तचोर..!
निशीदिन हवी सोबत तुझी खास
वाट तू शोधशील ना ? शब्दातुनी अंतरीचे भाव ओळखशील ना ?
सरतील मग विरहाचे क्षण सारे.. सापडेल मग प्रेमाचा नित्यनवा अनुभव..!!''
कागद तसाच उशाशी ठेवून मी झोपी गेलो.. पुन्हा जास्त न फिरताच मुंबईला मी परतलो होतो.. .

माझा पूर्ण विश्वास होता की 'योगायोग हे मुद्दाम घडत नाहीत'.. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतंच..मनात एक प्रश्न होताच.. ती 'पुन्हा भेटू लवकर' असं म्हणाली, ते नेमकं काय होतं - स्वप्नं की प्रेम ?
क्रमश:
क्रमश:
No comments:
Post a Comment