हे भलते अवघड असते..
(भाग ३)
…अवनी मुंबईला
येणार ही आनंदाची बाब होतीच; पण त्या चिठ्ठीत
नेमकं काय होत? ही उत्सुकता जास्त होती..
ती कोड्यातच बोलते
असं असलं तरी तिला ह्यावेळेस मला जपायचंही होतं आणि पत्रातून लवकर निरोप समजावा असंच
काहीसं सुचवायचं होतं.. मी गणितात सामान्य असल्याने ती गणितातली कोडी मला घालणार नाही
हे मी पुरता जाणून होतो..
मला लिहिलेलं पत्र
फ़ारसं काही सांगणार नसलं तरी त्यात मला जे सांगायचं होतं ते मी सहजच ओळखलं होतं.. कारण
एरव्ही मराठीत बोलणारी ती माझ्याशी.. मराठीत कविता करणारी ती.. माझ्याशी इंग्रजीत कसं
काय व्यक्त होईल ? हा माझ्याच मनात पडलेला प्रश्न..
अंकामध्येच काहीतरी
उत्तर असणार ह्याची जाणीव मला होतीच.. शाळेतही जरी कधी वेळेवर गृहपाठ पूर्ण केला नसला
तरी आज मला ते उत्तर शोधायचं होतं.. कारण नंतरला फार अंतर असतं आणि मला ते होऊ द्यायचं
नव्हतं.. अखेर सगळी इंग्रजी मुळाक्षरं एका कागदावर लिहून काढली. आणि त्यांना क्रमांक
दिले..
मग
मला त्या अंकांची जादू समजली अन् तिला भेटण्याचे 'गणित' मला उमगले ..
M A H E F D R
A P V T. L T D.
13 1 8 5 6 4
18 1 16 22 20 12 20 4
W O R L I
23 15 18 12 9
M U M B A I
13 21 13 2 1 9
: Mahefdra Pvt Ltd.,Worli,Mumbai
प्रेम
वेडं असतं असं सगळेच म्हणतात.. पण मला ते 'हुशार' करत होतं..!!
नव्या शहरात तिचं
आगमन झालं होतंच आणि मग जेव्हा तिला मी भेटायला
पोहोचलो. मग मुंबईत झालेली तिची अन् माझी पहीलीच भेट.. मी म्हंटलं, चल ना समोर सी-फेस
आहे, जाऊ तिकडेच.. तिचं इकडे फारसं कुणी ओळखीचं नसल्याने तिनेही आढेवेढे न देता सहज
होकार दिला. तिनं विचारलं मुंबईविषयी मला काय सांगशील ?
मुंबई..
लोकलच्या प्रवासात
तिसरी की चौथी सीट मिळेल ? हा प्रश्नच नाही आपण फक्त प्रवासाचा मनसोक्त आनंद घ्यायचा..
Humidity ची चर्चा
दुनिया करेल.. पण marine drive वर शांतपणे बसणे ह्यासारखा आनंद कुठेच नाही..
McDonalds,Café
Coffee Day मध्ये सर्वच जातील.. पण शेवपुरी आणि अस्सल वडापाव मात्र इथेच चाखायला मिळतो..
वा-याची झुळूक
एकवेळ क्षणभर विसावा घेत असेलही.. पण इथली माणसं तो देखील नाहीत..
आपल्या स्वप्नांची
पूर्तता करणारी, येथील अथांग अशा समुद्राप्रमाणेच कुणालाही सहज आपल्यात सामावून घेणारी..
प्रत्येकाला एकदा
तरी आवर्जून पहावी असं वाटणारी मायानगरी..
दोष
तर कुणीही काढतं.. पण ‘शोधक’ नजर असली की खुप काही गवसतं..
तिथे फक्त मीच
बोलत होतो, ती फक्त माझ्या चेह-याकडे पाहत ऐकत होती. समुद्राने किना-याला भेटताना जसं
सारंकाही द्यावं तसच अगदी मी बोलत होतो, अचानक
वाहणा-या वा-याबरोबर आलेला धुळीचा कण माझ्या डोळ्यात गेला. क्षणाचाही विलंब न करता
तिने तिचा रुमाल देण्यासाठी केलेली धडपड आणि डोळ्यात मारलेली फुंकर…आपुलकी शब्दांत व्यक्त करता येतच नाही म्हणतात
ना हे खरंच आहे.
वेळेचं भान ठेवून
मीच मग म्हंटलं उशीर होईल ..
चल निघुयात..
डोळ्यांत कचरा
गेल्याने पाणावलेल्या डोळ्यांत काही क्षण मला धूसर दिसत असलं तरी मनात एक चित्र स्पष्ट
उमटलं होतं..
ती,मी
आणि मुंबई..!!
उद्या पुन्हा भेटुयात
असं म्हणत आम्ही निघालो..
तिने पहिल्या पगारातच
नवीन फोन घेतला होता, इथली खुशाली घरी कळवता यावी याकरिता. दुस-या दिवशी मग तिने मला
नंबर दिला. अखेर माझ्या प्रेमाला तंत्रज्ञानाची जोड मिळालीच.
मग मात्र नियमित
भेटीगाठी आणि फोनवर बोलणं होत गेलं. इकडे तिला भेटण्यासाठी एकदा तिचे बाबाही मुंबईला
येऊन गेले होते, तेव्हा तेही भेटलेच. काळाचे संदर्भ तसे फार कमी जणांना ओळखता येतात.
गाणी ऐकताना मला गाण्याचे नवेच अर्थ समजत होते. हळूहळू मलाही कविता आव डू लागल्या होत्या. खरंच मी खूप
खुश होतो. आता माझं तिच्यावर प्रेम होतं हे मला माहीतच होतं. तिला माझी सोबत जरी आवडत
असली तरी तिचं माझ्यावर प्रेम होतं की नाही हे मात्र मला कळत नव्हतं. तिला इकडे येऊन
महिनाच झाला होता. पण तरीही अधिक वेळ जाऊ द्यावा असं मला वाटत नव्हतं. अखेर मनात निश्चय करून मी काहीसं
ठरवलंच.
मग हळूहळू जसा
विश्वास वाढत गेला, तशी मला जाणीव होत गेली की आता तिच्याशिवाय जगणं सहजशक्य नाही.
एकदा सहज आम्ही
फिरायला गेलो होतो. मला नाटक पहायची आवड फार, म्हणून तिने तिकीट काढून आणलेलं. नेमकं
नाटक सुरु व्हायला उशीर झाला आणि अर्थात संपायलाही.. ८-९ तरी वाजले असतील. तेव्हा घरी
जाऊन जेवण बनवायचा त्रास कशाला, म्हणून मग मीच म्हंटलं, “बाहेर जेवूयात?” मग तिनेही
होकार दिला; फक्त एका अटीवर.. की आजची ट्रीट तिच्याकडून घ्यायची. मग मी विचार न करता,
हो म्हणालो.
नाटकांचं नाव होतं..
' LOVE YOU.. again and again..’ मला नाटक फारसं आवडलं नव्हतंच. पण तिला ते जाणवू द्यावं
असं मला वाटलं नाही. कारण आवड-नावड हा प्रश्न
आपुलकीत नसतोच मुळी.. इथे फक्त काळजी असते..
मग मीच म्हंटलं,
“काय खाणारेस?” ती म्हणाली, “तू मागवशील ते..” मग तिच्या आवडीचं जेवण मी मागवलं.. आणि
ऑर्डर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तिला विचारलं, “तूझ्याकडे calculator आहे का गं?”
(मग बोलण्या-बोलण्यातच
तिच्या कडील नाटकाचं तिकीट मी मागितलं. एका तिकिटावर मी ' LOVE YOU..
ह्या शब्दांना - ती मी काय करतोय हे पाहणार नाही - अशा रीतीने पेनाने राऊंड
केले आणि पुढे त्या शब्दांची एकूण बेरीज लिहिली. आणि म्हटलं- “हे न उघडता तिकीट जपून ठेव एक आठवण म्हणून..”)
तर ती म्हणाली,
“घरी आहे, का रे ?”
मी म्हटलं,”तीन
अंकांची गणिताची जादू माहीत आहे का ? calculatorवर करण्यात मज्जा आहे.”
ती म्हणाली, “सांग
तर आधी, आवडेल मला ऐकायला.”
मग मी म्हटलं की
समज तू,मी आणि मैत्री हे तीन अंक.. पुन्हा एकदा तू मी आणि मैत्री.. असं सरळ गृहीत धर..
प्रतिष्ठा,पैसा,राग,
संशय, आनंद, आदर, भीती ,अपेक्षा, सुंदरता ,सवयी,काळजी ह्यांना त्यातून भागलं आणि जे
काही उरेल त्यांना पुन्हा प्रतिष्ठा,पैसा,राग, संशय, आनंद, आदर, भीती ,अपेक्षा, सुंदरता
,सवयी,काळजी, मन,बुद्धी ह्यांनी भागलं तर जे काही उरेल..
त्याला पुन्हा
तू मी आणि मैत्रीने भाग द्यायचा .. मग
उरतं फक्त.. उत्तर
“उत्तर जरी तुला
गवसलं तरी माझा तो प्रश्न आहे..?”
ती मन लावून ऐकत
होती. तेवढ्यात आमचं जेवणही उरकलं होतंच. माझं
मन मोकळं झाल्याचा आनंद होताच.. पण तिच्या चेह-यावर, ‘कोड्याचं उत्तर काय असेल’ हेच
होतं. मी तिला म्हणालो, ”एवढा काय विचार करतेस.
तुला उत्तर मिळालं
की तू हे तिकीट पाहू शकतेस..” आता मात्र ती हसली आणि मग आम्ही घरी जायला निघालो.
व्यक्त होण्यासाठी
कुठला तरी मार्ग लागतोच ना ? आमच्यात एक दुआ होता, ते म्हणजे ‘कोडं’. मग ह्यावेळेस
मी पुढाकार घ्यायांचा ठरवलं होतं आणि मीच तिला हे विचारलं होतं..
असाच निवांत पहुडलो
होतो.. डोळे तर बंद केले होतेच.. पण मन मात्र जागंच होतं. तिला उत्तर मिळेलही.. उत्तर नेमकं मला हवं तेच असेल
?
कधी
झोप लागली समजलंच नाही प्रतीक्षा होती, एका नव्या सूर्योदयाची..
क्रमश:
हे पत्र तुला लिहिताना का अबोल होते शाई ?
ReplyDeleteका रंग खरा शब्दांचा पानावर उमटत नाही ?
नभ ओळवते, मन मोहरते, पण तोल जात नाही
अनिवार सरी, उरतात उरी, बरसात होत नाही