दिवसरात्र पैशांसाठी धावत असताना..
निरागस अश्या आजुबाजूच्या आणि आत दडलेल्या 'बालपणा'कडे पहायला…
कितीसं लागतं... !!
अनुभवांतून घडलेल्या 'त्या' मूर्तींना उपेक्षित न ठेवता..
सहजचं.. बरं आहे ना.. ? विचारायला...
कितीसं लागतं... !!
फुकट तिकडे प्रकट होण्यापेक्षा..
पुरेसं पण 'समाधान'पूर्वक मिळवण्यासाठी..
कितीसं लागतं... !!
तक्रार तर सर्वच करतात..
पण तरीही 'दु:खाची झळ','आनंदाचे क्षण'
या आपल्या संमिश्र प्रसंगात,
नेहमीच साथीदार असणाऱ्या 'प्रवास'रमणीला
'Thank You' म्हणायला..
कितीसं लागतं... !!
Ownership चा भाग सोडता..
Global Culture ची चर्चा सोडता..
जन्म-मरणाच्या चक्रात नवनिर्मितीचा आनंद घेणाऱ्या..
'त्या' कळीला फुलू देऊन जगू देण्यास..
कितीसं लागतं... !!
कुणीतरी जिंकणारच..! कुणीतरी हरणारच..!
जीवनातील ह्या स्पर्धेत कुणीतरी मागे-पुढे राहणारच..
तरीही दुस-याच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी कधीतरी मुद्दाम हरण्यास..
यशापयशाची चर्चा न करता.. सहज 'खिलाडू'वृत्तीने खेळण्यास..
कितीसं लागतं... !!
टपरीवरचा चहा.. रात्रीचं चांदणं..
मातीचा स्पर्श.. पावसात भिजण्याची मजा..
आणि बरंच काही..!
'दुस-यातील गुणांचं' मोकळेपणाने Appreciation करायला..
कितीसं लागतं... !!
कधीतरी Surprise द्यायला.. हमखास 'वेळे'आधी पोहोचायला..
कुणालातरी न सांगता Call करायला..
आणि बरंच काही..!
शाळेतील मज्जा पुन्हा एक दिवस अनुभवायला..
कितीसं लागतं... !!
भाषेचा गोडवा गायला.. मनाची संवेदनशीलता जपायला..
कवितेला साद असो.. अभिनयाला दाद असो..
सत्य/ध्येयासाठी घातलेला वाद असो..
जगणं असं 'निर्विवाद' जगायला..
कितीसं लागतं... !!
गाण्याची तान असो.. जगण्याचे भान असो..
साक्षरतेचा दीप असो..
नाचण्यात - बागडण्यात घालवायचा क्षण असो..
वेडीवाकडी जंगलातील गडकिल्ल्यांची मोहीम असो..
आणि बरंच काही..!
असं 'मुद्दाम' वेळ काढून करायला..
कितीसं लागतं... !!
मी काय किंवा तुम्ही काय,
आपण तर सारेच 'आनंदयात्रेचे' प्रवासी आहोत..
मग कुणाच्यातरी दु:खात सहभागी व्हायला..
आनंदात सहज मागे राहायला..
कितीसं लागतं... !!
आयुष्याचं देणं तर देता देता फिटणार नाही..
'स्वत:' उजळल्याशिवाय अंधाराच 'राज्य' मिटणार नाही..
तरीही..
अपेक्षांचे ओझे न बाळगता.. मुक्तपणे.. समाधानाने..
आनंद 'देत-घेत' जगायला..
कितीसं लागतं... !!