Wednesday, 11 November 2015

नसतंच एSSवढ अंतर...




नसतंच एSSवढ अंतर, कवितेच्या ओळीमधलं,
अर्थांच असतं भांडार, त्या अंतरात दडलेलं

नसतेच कधीही मैफिल, 'रागावर' आधारलेली,
बसतेच चाल कवितेला, 'प्रेमाने' ओथंबलेली

तबल्याचा नसतो आकार तरी , यावा तो सदा 'समताल ',
भर भरून येऊ देत ताना, न जाता 'निषादा' पल्याड.

No comments:

Post a Comment