Wednesday, 11 November 2015

Weekend च्या काही रेघोट्या....



इतक्या गरम वातावरणातही, रोज Warm Up करावा लागतो,
मात्र याचसाठी आपला आवडता, 'गरम चहा' सोडावा लागतो;
Important या गोष्टीसाठी, 'डंब-एल्स' वापरावा लागतो,
40 kg वजनी 'TITANIC पोझ'ला FLY म्हणावा लागतो !!

भावाधाराने उभे राहताना " I'm falling with..." म्हणतात,
आणि अधिरतेने Dr.कडे जाणा-याला PATIENT म्हणून संबोधतात;
जवळचे असणारे सारे, मात्र गप्प राहतात,
आणि दूरवरचे "I'm always with U" send करतात !!

अशा विचित्र विनोदाच्या साथीने, कवितेशी मी 'खेळ' करतो,
जमलाच तर 'मेळ', नाहीतर 'खेळखंडोबा' ठरतो;
पाठवलेल्या रचनेविषयी वाचक 'ठेंगा दाखवून' वर्दी देतो
मग अशा वेळी मला "दाद न देणाराच" खरा दर्दी वाटतो !!

1 comment: