Wednesday, 11 November 2015

छे ! असं काही नाही....



" I'm using WhatsApp" वाले use करतात असे नाही,
"Busy" लिहून ठेवणारे 'कष्टाळू' असतात असे नाही,
Status मधून 'प्रगटतात सारे भाव मनीचे' खरं नाही,
सगळयांसाठीच हेच परिमाण लावणेही बरोबर नाही !

असते 'एकच' नाव Userचे म्हणती सारे खरं नाही
नसते सय नावांची त्या खास यां सारखे असत्य नाही
सुंदर से ते 'रूपक' देण्यासम महत्तम दुसरे कृत्य नाही
'नावं ठेवणं असभ्य आहे' म्हणण्यात आता तथ्य नाही !

'सवड मिळता संदेश पाठवतो' हि कुणाची सवय नाही,
रोज मेसैज करणारा 'कर्मकांडी' आहे असेही नाही !
'Last seen' Hide करतो, म्हणून 'जागतो' असे नाही,
hide करत नाही म्हणजे, लवकर 'झोपतो' असेही नाही !!

Chatting फांदीवरून 'वकावका बोलणारे', काही कावळे नाहीत,
आणि 'नुसतेच msg  वाचणारे' सगळेच काही  बगळे नाहीत !
copy - paste करणारे Data Operator यांहून वेगळे नाहीत !!

प्रवासास हे शब्दच निघती, माझ्याशी हा 'दुरावा' नाही,
पथिकांची तृषा शमविणारे, ते फक्त ओहोळ नाहीत, 
प्रतिबिंब असते तुमचेही त्यात,  या आरशा कधी पडदा नाही, 
वाचतात कविता सगळी, हि माझी "अंधश्रद्धा नाही"... 

No comments:

Post a Comment