'लहान आहेस' समजवणारे आता 'वाढणारे वय' दाखवू लागलेत
आडुन आडून आता 'एकच विषय' ताडू लागलेत
समाजापासून जपणा-या मनाला, लोकांची भीती दाखवू लागलेत
कळत नाही 'मी खरं ऐकू लागलोय' कि आता 'ते खोटं बोलू लागलेत' ?
गप्पांच्या फैरी झाडणारे, तलवार म्यान करू लागलेत
status मधून सारे आपले निशाण फडकवू लागलेत
थोडं जाणवू लागलंय म्हटल -
मला 'बाळ' ठेवून सारे 'राज' होऊ लागलेत !
भावाचे निर्मळ पाणी सुद्धा बुद्धीने गाळू लागलेत
कट्ट्यावरती बोलणारे आता शब्दमर्यादा पाळू लागलेत
कोण एकेकाळी 'मनकवडा ' म्हणणारे आता 'बोलघेवडा' म्हणून संबोधू लागलेत
समजणं जरा कठिण झालंय, 'मी बिघडू लागलोय' कि काळानुरूप 'ते बी घडू लागलेत' ?
'रुसु'रुसलेल्या मनाने आता नवीन खेळ 'सुरु' केलेतं
'राम-राम' म्हणणारे आता ते 'मरा-मरा' म्हणू लागलेयं
होता ज्यावर 'ताबा' तेही 'बाता' मारू लागलयं
'फुलपाखराचं' उलटं आता 'सुरवंट' होऊ लागलयं!

No comments:
Post a Comment