Wednesday, 11 November 2015

आपण...देतच हो जायचे



'जमती भूते जिथे शीssते असती'
कलियुगाची सहज रीत ती !
विशुद्धतेने भूतांनाही माणसाळवयाचे,
आनंदाने आपण त्यांना देतच हो जायचे !!

दोष सांगति सातत्याने,
खास असे ते अपुल्या कारणे !!
हितचिंतकांचे बि-हाड अपुल्या बाजूस थाटायचे, 
सगुणतेने धन्यवाद त्या देतच जायचे !!

मूर्त्या सदोदित मनमंदिरी त्या,
सगुणते वा निर्गुणतेने !!
प्रगट ता  पुढती आपण त्यांचे दर्शन ते घ्यायचे,
आत्मियतेने  अभिवादन देतच हो जायचे !!

शब्दांच्या या नावेवर कुणी,
वर्षावे किंवा बरसावे !!
भावसागरी जमून येती फेन तरंगांचे.
आपण शांतपणाने वल्हे, देतच हो जायचे !!

No comments:

Post a Comment