" वादातीत ही नसते काही वादांमधले
सांधुनि बघ तू माझ्यासाठी 'संवाद' काही "
" किती किती हे वयस्थपणाचे मिरविशी टेंभे
विशी तल्या बालकात जाऊन बघ ना काही "
"सदा न कदा शहाण्या सम आपण वागायाचे
वागून वेड्यागत तू केव्हा बघ ना काही "
" चौरसातल्या जगतामध्ये आता रस नाही
पल्याड हमरस्त्यावर सरसर चालू काही "
" नको नको ते हवेसारखे बोलून गेलो
हवे हवे तर नको लिहू तू म्हणना काही "
No comments:
Post a Comment