Wednesday, 11 November 2015

थोडसं वेगळं…


सभोवताली पसरलेले आकाश…
'त्या'च्या छत्रछायेखाली जपलेले आपले जीवन एक 'विलक्षण' अनुभव आहे.
ज्याप्रमाणे दिवसभर केलेले 'प्रयत्न' जितके अनिवार्य आहेत… तितकीच रात्रीची 'शांतता' सुद्धा…!
ता-याशी बोलणं ही एक 'कला' आहे… ती सर्वांनाच अवगत असेल असं काही नाही… पण शिकण्याची इच्छा असली की, 'तारे' देखील गुरु होतात.
दिवसभर केलेल्या अविरत कर्मयोगानंतर येणाऱ्या संधीप्रकाशात मनाची जेव्हा कासावीस होते की,'आपण जीवनात यशस्वी तर होऊ ना?'
तेव्हा अंधारात उज्ज्वल भविष्याकडे जाण्यासाठी ह्या तारकाच आपली सोबत करतात… आकाशातील हे मनोहर असे चित्र शांतपणे पाहत त्याचा मनमुराद आस्वाद घेणे अगदी कुणालाही सहज शक्य आहे…
मानवाला एकदा का हृदयाची विशालता कळाली की…. व्यक्तित्वे ही डोळ्यांची पारणे फेडणारी 'नक्षत्रे'च बनतात….











No comments:

Post a Comment