Wednesday, 11 November 2015

पडू नको ! 'कसातरी'


पावसाच्या 'अनियमित' वेळापत्रकामुळे, 'चुकणा-या' नियमित भेटींना कंटाळून 
पावसाला 'सुनावणारा' कवी...

पडू नको ! 'कसातरी' सकाळ - संध्याकाळी
हवा तसा नाचून घे! तू शेष 'मध्यान्हकाळी'

हि आहे निर्भीड लाघवी अन 'लाजाळू मनाची'
मला नाही एक सवय उगा 'कनवाळूपणाची'
तुम्ही ज्ञानी भाऊराया, समजा अडचण भगिनीची,
तू 'असता' तिथे तिने कशी छत्री 'मिटायची' ?

पाते लवते न तोच सारे आभाळ भरते,
तुझ्या 'तिच्या' प्रेमा कशी मग भरती जडते,
'तू येता' हिच्या डोईवर 'छत्री' उभारते
'धार मुसळ' असूनही मनी 'ओहोटी' लागते

तुझ्या 'अवेळी येण्याने' हि तिचा थाटच हरते,
तुझ्या 'अवेळी जाण्याने' जनलाट धडकते !
होऊन लाटेवर स्वार मन 'स्वजन' शोधते,
हलक्या थेंबांच्या पुढती मन मणाने भरते !! 

No comments:

Post a Comment