Wednesday, 11 November 2015

नविन रेखाटन....


ह्याला करतो फोन, कधी त्याला करतो फोन, ☎
सदा कानी पडतो माझ्या, एकच 'बिझी टोन' !
करत असाल बहुदा, तुम्हीही मला फोन,
"मित्र बदललेत वाटतं" असा उगा मम दृष्टीकोन !!

तुंग तुंग शिखरांवर, सर व्हावी एक करारी,
ढगां सवे बरसून, फुलावी दुनिया  सारी !
शांत बसून राहण्याशी, अवगत नाही मज यारी,
लोका उगा वाटे माझी काम लय भारी !!

आठवड्यापरत्वे जमतोय, कवितेचा हा GAME,
चुकवू नये वाटे, असा एक नेम !
भय नसे मज कुठलेही, हा प्रवास सुंदर क्षेम,
कारण तुम्ही एक आहात "खडा around my GEM" !!

No comments:

Post a Comment