Wednesday, 11 November 2015

भेटतात ना ! 'व्यक्ती' ??



"नवीन कविता, जुनाच प्रश्न, जाण्या समीप उत्तरा,
केला छोटासा यत्न ?"


प्रत्येकाची सहज 'गती',
अन् सहज 'विचरते' मती,
भेटतात ना ! 'व्यक्ती',
वा नुसतेच 'हेतू' किती ??

जाती विद्यालयी 'उत्तरे', केवळ प्रश्नपत्र 'सोडवण्या',
चढती शिवालयी उंची अत्तरे, नवसाच्या 'बोलण्या',
'जडते' रीत पसा-याची, ठेऊन 'ज्ञाती' नजरेपुढती,
'पडते' प्रीत जीवांची सम त्या, अडता 'status' वरती..

बरसतो 'मल्हार' मनावर, सूर- ताल भेटता,
अन् उठते 'काहुर' उगाच मनी, नुसता डोळा लवतां,
चढती सरसर 'दहा' पाऊले होऊन 'वा-यापुढती',
चालती अलगद 'चार' पाऊले, कुठे 'चांदण्याराती'...

'निर्हेतुक' हा प्रश्न विचारी,
तुम्हांस नसावी भीती,
अनुत्तरित या प्रश्नावरती...
काळाच्या पडताहेत "फिती" !

No comments:

Post a Comment