कधी अचानक, कधी अनामिक भेट ही ठरलेली..
रात्रीच्या त्या निरव शांततेत निद्रा ही उडालेली..
ओघवत्या गप्पांच्या त्या नादात रात्र ही सरलेली..
पुन्हा होईलच भेट ही भीतीयुक्त आस मनी उरलेली..
मौनातील संवादांचे अर्थ लावता लावता झोपु शकलो नाही..
इतके होते का तुझे माझ्यावर प्रेम हे मात्र ओळखू शकलो नाही..
लपवलेल्या त्या मनात भावनेलाच स्थान आहे
वाटतं नसलं 'खरं' तरी सुख:- दु:ख , राग द्वेषाला मात्र मान आहे
''स्वप्नांची आहे सोबत म्हणून वास्तविकतेला 'अर्थ' आहे..
जर स्वप्नच पडली नाहीत तर झोप सुद्धा 'व्यर्थ' आहे !''
No comments:
Post a Comment